MLA Randhir Savarkar : प्रशासनातील महसूल विभागाशी समन्वय ठेवून नागरिकांनी आपली सर्व कामे करून घ्यावीत, असे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत बोरगाव मंजू येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.

बोरगाव मंजू येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर संपन्न
संजय तायडे
बोरगाव मंजू : प्रशासनातील महसूल विभागाशी समन्वय ठेवून नागरिकांनी आपली सर्व कामे करून घ्यावीत, असे प्रतिपादन अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत बोरगाव मंजू येथे आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.
बोरगाव मंजू येथे महसुली व इतर शासकीय सेवा शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर नागरिकांसाठी उत्तम संधी ठरले असून अनेक कामे एकाच ठिकाणी जलद गतीने पूर्ण करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आ. रणधीर सावरकर उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये उपविभागीय अधिकारी शरद जावळेकर, तालुका कृषी अधिकारी अंबादास उमाळे, विवेक भरणे, महेंद्र काळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिर शुक्रवार, ८ मे रोजी सकाळी १० वाजता परशुराम नाईक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ७/१२ व ८-अ उतारे तसेच दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे, डिजिटल स्वाक्षरी सुविधा, जमीन व नोंदणी संदर्भातील माहिती, विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे आदी विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. विविध प्रमाणपत्रांचे वितरण आ. रणधीर सावरकर यांच्या हस्ते नागरिकांना करण्यात आले. शिबिराचा लाभ घेण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी पंकज वाडेवाले, जयकृष्ण ठोकळ, सुनील खेडकर, सुबोध गवई, बंटी मागे, डॉ. रुपाली पवार, तलाठी प्रवीण चव्हाण, सुनीता दातकर, अंजली इंगोले, दीक्षा चौधरी, पुरुषोत्तम गायवाडे, अरविंद ढोले, संतोष ठाकूर, राधा राठोड, अमोल कुंभारे आदी उपस्थित होते. तसेच अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पशुवैद्यकीय अधिकारी, नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिहर निमकंडे (मंडळ अधिकारी, बोरगाव मंजू) यांनी केले. संचालन ज्योती कराळे (तलाठी, सगळूद) यांनी केले, तर आभार प्रदर्शन अर्चना चव्हाण यांनी मानले.

