Mahabreaking

[breaking_news]

Child Marriage :प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दगडपारवा येथील बालविवाह रोखला

Child Marriage : तालुक्यातील दगडपारवा येथे ७ मे रोजी एका समाजातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर महिला व बालकल्याण समिती आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत हा बालविवाह रोखण्यात यश आले.

Child Marriage

लग्नमंडपातच प्रशासनाची धडक; अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवला

बबन इंगळे

बार्शीटाकळी : तालुक्यातील दगडपारवा येथे ७ मे रोजी एका समाजातील अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर महिला व बालकल्याण समिती आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त कारवाईत हा बालविवाह रोखण्यात यश आले.

विशेष म्हणजे विवाहासाठी दोन्ही कुटुंबांकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळी व पाहुण्यांच्या जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मात्र विवाह संपन्न होण्यापूर्वीच बालविवाह प्रतिबंधक समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि पोलिसांनी थेट लग्नमंडपात धडक देत हा बालविवाह थांबवला.यावेळी समितीने विवाह लावून देणाऱ्या दोन्ही कुटुंबातील जबाबदार व्यक्तींना, तसेच सरपंच व पोलीस पाटील यांना समज देऊन समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.ही कारवाई जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली, बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या देखरेखीखाली महिला व बालकल्याण समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.बालविवाह लावून देणे हा कायद्याने गुन्हा असून अशा प्रकाराची माहिती मिळाल्यास त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन किंवा बालविवाह प्रतिबंधक समितीला कळवावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top