MLA Manoj Kayande :महाराजस्व समाधान शिबिर’ विविध लाभार्थ्यासाठी ठरणार पर्वणी ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार मनोज कायंदे यांनी केले. महसूल विभागांतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार देऊळगाव राजा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ (टप्पा 2) आयोजित करण्यात आले आहे.

494 दाखल्यांचे वाटप, शेतकऱ्यांना ट्रॅक्टर-हार्वेस्टरचे वितरण
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराजस्व समाधान शिबिर’ विविध लाभार्थ्यासाठी ठरणार पर्वणी ठरणार आहे, असे प्रतिपादन आमदार मनोज कायंदे यांनी केले. महसूल विभागांतर्गत ग्रामीण तसेच शहरी भागातील सामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांचे दैनंदिन प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार देऊळगाव राजा तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ (टप्पा 2) आयोजित करण्यात आले आहे. आज दिनांक 8 मे रोजी देऊळगाव राजायेथे नगरपरिषद सभागृहात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरात 494 दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
आयोजित सदर शिबिर हे कास्तकार, विविध विभागातील लाभार्थी त्यांच्यासाठी महसूल कृषी पशुवैद्यकीय पंचायत समिती, नगरपरिषद आणि इतर विभागाच्या विविध प्रकारच्या घरकुल योजना या संदर्भातील कामे हे जागेवर होणार असल्याने एक प्रकारे लाभार्थ्यांसाठी चांगली संधी असल्याचे विभागाचे आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले.

शासनाने आदेशित केल्याप्रमाणे ग्राम पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरामध्ये विविध विभागाचे ग्रामीण कास्तकारांचे कार्यालयाचे विविध प्रकारचे कामकाज हे शिबिर घेऊन जाग्यावर करा असे आदेश आहे. त्याच अनुषंगाने सदर शिबिराचे आयोजन आज देऊळगाव राजा येथे करण्यात आले होते. या ठिकाणी शहर आणि परिसरातील विविध गावच्या लाभार्थ्यांची उपस्थिती होती सदर शिबिरामध्ये आज जिवंत सातबारा अंतर्गत झालेल्या वार्षिक नोंदी एकूण , कार्यालयीन विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, विविध विभागातील नोंदीसाठी सदर शिबिरात अर्ज प्राप्त झाले. त्रुटी नसलेले अर्ज जागेवर मंजूर करण्यात आले. आजच्या या कार्यक्रमासाठी विभागाचे आमदार मनोज कायंदे यांनी उपस्थित राहून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आपल्या कामांमध्ये तत्पर राहण्याचे आदेश यावेळी दिले आमदार विविध विभागाचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगर जाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माधुरी सिपणे ह्या होत्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी भगवान कच्छवे, पुरवठा अधिकारी चंद्रकांत इंगळे, मुख्याधिकारी अरुण मोकळ, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड,नगर परिषदेचे बांधकाम सभापती विष्णू झोरे, गटनेते प्रदीप वाघ, , नगरसेवक निशिकांत भावसार, धनसिंग सिंपणे, विभागाचे मंडळ अधिकारी विनोद डोईफोडे, मंडळ अधिकारी रामदास मान्टे, मंडळ अधिकारी विजय हिरवे,ग्राम महसूल अधिकारी राजू ताग वाले, बबन काकड, यांच्यासह पंचायत समिती, पशुसंवर्धन,तालुका कृषी कार्यालय विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या अभियानांतर्गत महसूल मंडळाच्या स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात देण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

