Mahabreaking

[breaking_news]

Girls Reign Supreme :एस . ई . एस . हायस्कूलमध्ये पुन्हा मुलींचा डंका, प्रिती सिरसाठ हिला ९९:६० टक्के गुण 

Girls Reign Supreme : सिंदखेडराजा तालुक्यात १० वी परीक्षा निकालात साखरखेर्डा पुन्हा टाॅपवर राहिले असून एस. ई .एस. हायस्कूलची प्रिती सिरसाठ हिने तब्बल ९९:६० टक्के गुण मिळवून मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यातून प्रथम आली आहे . तसेच गौरी तुपकर हिने ९८:८० , प्रगती राऊत , स्नेहा रणमळे , आरुषी कठाळे या तिघींनी ९७: ४० टक्के गुण मिळवून तृतीय आल्या आहेत . श्री शिवाजी हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे . जिजामाता विद्यालयाचा निकाल ९९:८० टक्के लागला आहे.

Girls Reign Supreme

श्री शिवाजी हायस्कूलचा १०० टक्के निकाल
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यात १० वी परीक्षा निकालात साखरखेर्डा पुन्हा टाॅपवर राहिले असून एस. ई .एस. हायस्कूलची प्रिती सिरसाठ हिने तब्बल ९९:६० टक्के गुण मिळवून मातृतिर्थ सिंदखेडराजा तालुक्यातून प्रथम आली आहे . तसेच गौरी तुपकर हिने ९८:८० , प्रगती राऊत , स्नेहा रणमळे , आरुषी कठाळे या तिघींनी ९७: ४० टक्के गुण मिळवून तृतीय आल्या आहेत . श्री शिवाजी हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे . जिजामाता विद्यालयाचा निकाल ९९:८० टक्के लागला आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात अव्वल स्थान कायम ठेवीत याहीवर्षी शिक्षणाचा पॅटर्न अधोरेखित केला आहे. दरवर्षी जिजामाता विद्यालय , एस ई एस हायस्कूल , श्री शिवाजी हायस्कूल यांच्यामध्ये १० वीच्या निकालात स्पर्धा राहिली आहे . कधी शिवाजी हायस्कूल तर जिजामाता विद्यालय आणि एस ई एस हायस्कूल टाॅपवर राहायचे. येथे सहकार विद्या मंदिर आणि अनिकेत सैनिक स्कूल सुध्दा आहे . एस ई एस हायस्कूल मधील प्रिती नकुल सिरसाठ ९९:६० , गौरी शत्रूघ्न तुपकर ९८:८० , प्रगती गोपीनाथ राऊत , स्नेहा संदीप रणमळे , आरुषी गणेश कठाळे या तिघींनी समाण ९७:४० टक्के गुण मिळविले . भाग्यश्री विजय मंडळकर ९७;२० , गौरी विजय जाधव ९७ टक्के , पुजा विष्णू थुट्टे ९६:२० , आदित्य राजू निकम , ऋतुजा पंचाळ ९६ टक्के गुण मिळविले आहे .
श्री शिवाजी हायस्कूल मधील १४० पैकी प्राविण्य श्रेणीत १०६ , प्रथम श्रेणीत २५ आणि द्वितीय श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . या हायस्कूलचा मयुर देशमुख ९७ टक्के , योगेश काळे ९६:६० , पल्लवी रिंढे ९६:२० , विराज विष्णू बेंडमाळी ९६ टक्के , भाग्यश्री समाधान कंकाळ ९५ गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत . तर जिजामाता विद्यालयाचे अंजली जाधव ९५:६० , योगीता खरात ९५:४० , सुरज कठाळे ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत . या विद्यालयातून १५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्राविण्य श्रेणीत ११० , प्रथम श्रेणीत ३३ , द्वितीय श्रेणीत ११ आणि पास एक आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top