Amrita Shende : येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून इंग्रजी माध्यमातून अमृता शेंडे हीने ९७.२० टक्के घेऊन इंग्रजी विभागातून पातूर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर करण पवार याने ९६.८० टक्के मिळवून द्वितीय व श्रावणी नाकट हीने ९५.६० टक्के मिळवून शाळेतून तिसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे.

किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा शंभर टक्के निकाल: अमृता शेंडे प्रथम तर करण पवार दुसरा, श्रावणी नाकट तिसरी
पातूर : येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून इंग्रजी माध्यमातून अमृता शेंडे हीने ९७.२० टक्के घेऊन इंग्रजी विभागातून पातूर तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर करण पवार याने ९६.८० टक्के मिळवून द्वितीय व श्रावणी नाकट हीने ९५.६० टक्के मिळवून शाळेतून तिसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे.
गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, शिक्षक नरेंद्र बोरकर, हरिष सौंदळे, अविनाश पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत इंग्रजी माध्यमातून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या अकरा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यापेक्षा गुण मिळवत बाजी मारली. अमृता शेंडे 97.20 टक्के, करण पवार 96.80 टक्के, श्रावणी नाकट 95. 60 टक्के, ऋतुजा राठोड 95 टक्के, प्रथमेश अमानकर 94.20 टक्के, श्रावणी गिऱ्हे 93.60 टक्के, साहिल पवार 92.20 टक्के, अमित राठोड 91.60 टक्के, प्रशिका खंडारे 91.40 टक्के, सिद्धांत पेंढारकर 90.60 टक्के, अंकित पाटील 90.20 टक्के , सलोनी खोडे 89.40 टक्के, कृष्णा सरप 89.20 टक्के, अविशा इंगळे 88.80 टक्के, नैनश्री जाधव 88.20 टक्के, प्रणव कांबळे 88.20 टक्के, मनस्वी जाधव 87.40 टक्के, ऋषिकेश मृग 87 टक्के, मानसी देशपांडे 86.40 टक्के, भावेश राऊत 86 टक्के, नागेश घुगे 85 टक्के, प्रज्ञा तेलगोटे 84.80 टक्के, उज्वल गायकवाड 84.20 टक्के, श्रावस्ती पोहोरे 83.60 टक्के, प्राची धाडसे 81.20 टक्के, श्रेयश बगाडे 80.60 टक्के, अभिज्ञान पवार 76.80 टक्के, श्रुती घुगे 75.60 टक्के, अंजली हिरळकर 74.20 टक्के आदी विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यश संपादन केले.

