Two Drown in Man River : पातूर तालुक्यातील तुलंगा बु येथील मन नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता घडली. या घटनमुळे तुलंगा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिलीप वसंत मुंडे (वय ४०, रा. तुलंगा बू) आणि अजाबराव तुकाराम तायडे (वय ५२, रा. चिखलगाव) अशी मृतकांची नावे आहेत.

राहुल सोनोने ,वाडेगाव : पातूर तालुक्यातील तुलंगा बु येथील मन नदीच्या पात्रात बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता घडली. या घटनमुळे तुलंगा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिलीप वसंत मुंडे (वय ४०, रा. तुलंगा बू) आणि अजाबराव तुकाराम तायडे (वय ५२, रा. चिखलगाव) अशी मृतकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप वसंत मुंडे आणि अजाबराव तुकाराम तायडे हे दोघे शनिवारी दुपारी मन नदीच्या पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा शोध सुरू केला. मात्र बराच वेळ शोध घेऊनही मृतदेह सापडत नसल्याने चान्नी पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आली. त्यानंतर महान येथील मानव सेवा आपत्ती संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध पथकाला पाचारण करण्यात आले. शोध पथकातील प्रतीक बोरसे, शेखर केवट, हरीश जुमले, ओम ताले, अक्षय धोत्रे आदींनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले. या शोधकार्यात दिग्रस बू येथील ओम अनंता ताले, कपिल सारंगधर ताले आणि अक्षय धोत्रे यांनीही विशेष प्रयत्न केले.
घटनेची माहिती मिळताच प्रभारी तहसीलदार दिनकर केंद्रे, ग्राम महसूल अधिकारी डी. के. देशमुख, डी. जे. नकाशे, महसूल सेवक कपिल ताले, दीप ताले, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे, बीट जमादार घुगे, पोलिस पाटील अशोक तायडे, खुशाल तायडे आदी अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह पुढील शवविच्छेदनासाठी पाठविले. या प्रकरणी पुढील तपास चान्नी पोलीस करीत आहेत.या घटनेमुळे तुलंगा व परिसरात शोककळा पसरली आहे.

