Ten-Day Shramanera Camp :येथील सिद्धार्थ नगर येथे दि. २२ एप्रिलपासून आयोजित दहा दिवसीय श्रामणेर शिबिराची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच बुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

उपासक-उपासिका व युवकांचे भरीव सहकार्य
वाडेगाव : येथील सिद्धार्थ नगर येथे दि. २२ एप्रिलपासून आयोजित दहा दिवसीय श्रामणेर शिबिराची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त तसेच बुद्ध पौर्णिमेच्या औचित्य साधून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
वाडेगाव व परिसरातील बौद्ध उपासकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन या शिबिरात सक्रिय सहभाग नोंदविला. दहा दिवस भंते धम्मसार यांनी प्रशिक्षण देत श्रामणेर संघ तसेच उपासक-उपासिकांना धम्माचे सखोल ज्ञान दिले. या काळात परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले होते.
शिबिरादरम्यान विविध दात्यांनी दररोज श्रामणेर संघासाठी अल्पहार, थंडपेय व भोजनाची व्यवस्था करून उत्स्फूर्त सहकार्य केले. दि. १ मे रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त वाडेगाव व परिसरातील बौद्ध अनुयायांसाठी भोजनदान मेजर मंगेश तायडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याच दिवशी सायंकाळी ७ वाजता श्रामणेर संघ, उपासक-उपासिका तसेच गावातील नागरिकांनी कॅंडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शांततेत पार पडलेल्या या मिरवणुकीनंतर श्रामणेरांनी चिवर उतरवून भंते निर्वाण यांच्या हस्ते पंचशील ग्रहण केले आणि शिबिराची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रविण तायडे यांनी मानले. या प्रसंगी उपासक, उपासिका तसेच युवक वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी युवकांनी विशेष परिश्रम घेतल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

