Mahabreaking

[breaking_news]

Pan Shop in Densely :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, भरवस्तीतील पानटपरी फोडली

Pan Shop in Densely :गावातील भरवस्तीत असलेल्या पानटपरीतील महागड्या सिगारेटसह चोरट्यांनी जवळपास एक लाख रुपयांचा एवज लंपास केला. ही घटना 1 मे रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Pan Shop

 सिगारेटसह जवळपास लाखाचा माल लंपास ; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी

डोणगाव : गावातील भरवस्तीत असलेल्या पानटपरीतील महागड्या सिगारेटसह चोरट्यांनी जवळपास एक लाख रुपयांचा एवज लंपास केला. ही घटना 1 मे रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रकरणी फिर्यादी अनुप विनायक उमाळकर (वय ४९, रा. डोणगाव) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनुसार, उमाळकर यांनी १ मे रोजी रात्री सुमारे ११ वाजता आपले दुकान नेहमीप्रमाणे बंद केले होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि महागड्या सिगारेटच्या बॉक्सवर डल्ला मारला.

२ मे रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी गोल्ड फ्लेक (८०० नग), इंडीमिंट (१०० नग), गोल्ड फ्लेक लाईट (१०० नग), क्लासिक डबल बटन, ॲडव्हान्स कॉम्पॅक्ट, मार्लबोरो (प्रत्येकी १०० नग) तसेच ब्रिस्टॉल (५०० नग) यांसह विविध ११ प्रकारच्या सिगारेटचे बॉक्स लंपास केले. चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत ९९,८०० रुपये इतकी आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ व ३३४ (१) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण सानप करत आहेत.

दरम्यान, याच दुकानात यापूर्वीही चोरी झाल्याची चर्चा असून, अलीकडे नागापूर शिवारात मोटार केबल चोरीची घटना घडल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचे दिसून येते. गाव व शिवारात वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते, पोलीस गस्त मुख्यत्वे राज्य महामार्गापुरती मर्यादित राहते. त्यामुळे गावातील अंतर्गत भागात गस्त वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः रात्री पायी गस्त वाढवून चोरट्यांवर अंकुश ठेवावा, अशी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top