Mahabreaking

[breaking_news]

Speeding Car Collides :भरधाव कारची दुचाकीस धडक, वडील ठार, मुलगा गंभीर जखमी

Speeding Car Collides :भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने वडील जागीच ठार झाले तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना  राष्ट्रीय महामार्गावर बाभुळगाव नजीक शनिवारी (2 मे) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रविंद्र रामकृष्ण अढाव (वय 50, रा. पातुर्डा) असे मृतकाचे नाव असून त्यांचा मुलगा पियुष रविंद्र अढाव (वय 17) हा गंभीर जखमी आहे.

Speeding Car Collides

 राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पातुर्डा गावावर शोककळा

 संजय तायडे

अकोला : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने वडील जागीच ठार झाले तर मुलगा गंभीर जखमी झाला. ही घटना  राष्ट्रीय महामार्गावर बाभुळगाव नजीक शनिवारी (2 मे) सायंकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. रविंद्र रामकृष्ण अढाव (वय 50, रा. पातुर्डा) असे मृतकाचे नाव असून त्यांचा मुलगा पियुष रविंद्र अढाव (वय 17) हा गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र अढाव व त्यांचा मुलगा पियुष हे वाशिंबा येथील नातेवाईकांकडून मोटारसायकल (क्र. एमएच 28 ओव्ही 6128) ने अकोल्याकडे परत येत होते. बाभुळगावजवळील जवाहर नवोदय विद्यालय परिसरात मागून येणाऱ्या जीजे 26 एई 9073 क्रमांकाच्या कार चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत दोघेही सुमारे 8 ते 10 फूट फरफटत गेल्याने गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कार चालकानेच दोघांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती रविंद्र अढाव यांना मृत घोषित केले. पियुष अढाव याच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच आयपीएस अधिकारी इशानी आनंद, पोलिस उपनिरीक्षक स्वाती वानखडे, हेडकॉन्स्टेबल सचिन धनबहादुर, अशोक मराठे, संतोष डाबेराव आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी कारसह चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top