Mahabreaking

[breaking_news]

Elderly Woman Assaulted :लग्नाची माहिती दिल्याच्या संशयावरून वृद्धेस मारहाण ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Elderly Woman Assaulted : माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून 75 वर्षीय महिलेला लाकडी गजाने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बायगाव खुर्द येथे 1 मे रोजी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Elderly Woman Assaulted

देऊळगाव राजा : माहिती पोलिसांना दिल्याच्या संशयावरून 75 वर्षीय महिलेला लाकडी गजाने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बायगाव खुर्द येथे 1 मे रोजी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरुबाई साहेबराव जाधव (वय 75, रा. बायगाव खुर्द) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सलीम शेख ईब्राईम, कलीम शेख अमीद, रोषश शेख कलीम व परवीन शेख वशिम (सर्व रा. बायगाव खुर्द) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटना दिनांक 1 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास देऊळगाव परिसरात घडली. फिर्यादी व आरोपी हे एकाच गावातील असून वेगवेगळ्या जातीचे असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी फिर्यादीला “तुम्ही आमच्या मुलीच्या लग्नाबाबत पोलीस स्टेशनला माहिती का दिली?” असा जाब विचारत वाद घातला. यावेळी सलीम शेख ईब्राईम याने हातातील लाकडी गजाने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. तसेच वशिम शेख ईब्राईम याने चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान फिर्यादीची मुलगी सुनीता मुकुंद खिल्लारे ही आईला सोडविण्यास आली असता, तिलाही आरोपींनी ढकलाढकली करत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटून पडली असून ती हरवली आहे. तसेच मोबाईल फोनही गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश नागरे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top