Mahabreaking

[breaking_news]

Buldhana District Tops Amravati Division :बारावीचा निकाल जाहीर,बुलढाणा जिल्हा अमरावती विभागात अव्वल

Buldhana District Tops Amravati Division : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये बुलढाण जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला आहे.  विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसह शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनामुळे हा निकाल गाठता आला असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांनी सांगितले.

Buldhana District Tops Amravati Division

95.22 टक्क्यांसह उज्ज्वल यश; चिखली-देऊळगाव राजा अव्वल; काही तालुक्यांचा निकाल घसरला

बुलढाणा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये बुलढाण जिल्ह्याने दमदार कामगिरी करीत अमरावती विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 95.22 टक्के लागला आहे.  विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांसह शिक्षक व पालकांच्या मार्गदर्शनामुळे हा निकाल गाठता आला असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल अकाळ यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 34 हजार 469 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 34 हजार 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये   32 हजार 575 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मुलांच्या तुलनेत मुलींची टक्केवारी अधिक असल्याचे चित्र दिसून आले आहे. मुलांचा निकाल 94.32 टक्के, तर मुलींचा निकाल 96.29 टक्के लागला आहे. जिल्ह्यात 17 हजार 543 मुले तर 15 हजार 32 मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

तालुकानिहाय निकालात काही ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी दिसून आली, तर काही तालुक्यांमध्ये तुलनेने कमी टक्केवारी नोंदवली गेली.देऊळगाव राजा तालुका 98.87 टक्क्यांसह सर्वाधिक टक्केवारी मिळवणारा ठरला आहे.त्यानंतर . चिखली तालुक्याचा 98.38 टक्के , सिंदखेड राजा (98.09%) आणि बुलढाणा तालुका (97.82%) यांनीही उच्च निकाल नोंदवत जिल्ह्याच्या गुणवत्तेत भर घातली आहे.

दुसरीकडे, लोणार (96.87%), मेहकर (94.95%) आणि खामगाव (94.89%) या तालुक्यांनीही चांगली कामगिरी करत स्थिर निकाल दिला आहे. नांदुरा (91.07%), मलकापूर (91.17%), जळगाव जामोद (93.07%) आणि संग्रामपूर (93.81%) यांनी मध्यम स्तरावरील निकाल नोंदवले आहेत.

मात्र, काही तालुक्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे दिसून आले. मोताळा तालुक्याचा निकाल 90.49 टक्के इतका नोंदवला गेला असून, शेगाव तालुक्याने केवळ 87.55 टक्के निकालासह जिल्ह्यातील सर्वात कमी टक्केवारी मिळवली आहे. या तालुक्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. या निकालामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीला नवे बळ मिळाले असून, गुणवत्तावाढीचा सकारात्मक कल कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील वर्षात कमी निकाल असलेल्या तालुक्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून जिल्ह्याचा एकूण निकाल आणखी उंचावण्याचा निर्धार शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

अमरावती विभागात जिल्ह्याची दमदार कामगिरी

अमरावती विभागात बुलढाणा जिल्ह्याची दमदार कामगिरी राहीली आहे. जिल्ह्याने 95.22 टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. वाशिम जिल्हा 91.15 टक्यासह दुसऱ्या, अकोला 90.14 टक्के तिसऱ्या, यवतमाळ 89.69 टक्के चौथ्या क्रमांकावर राहीला आहे. तसेच अमरावती जिल्हा विभागात शेवटच्या क्रमांकावर राहीला आहे. या जिल्ह्याचा निकाल 88.26 टक्के लागला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top