Mahabreaking

[breaking_news]

Monali Athavale :प्लंबिंग कामगाराच्या मुलीची झेप; मोनाली आठवले कर सहाय्यक अधिकारी

Monali Athavale :रिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, याचा प्रत्यय अकोला तालुक्यातील धोर्तडी येथील मोनाली दीपक आठवले हिने देऊन दाखवला आहे. प्लंबिंग कामावर मजुरी करणाऱ्या वडिलांची मुलगी असलेल्या मोनालीने कोणतीही ट्युशन न लावता एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत कर सहाय्यक अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.

Monali Athavale

ट्युशन न लावता एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण  : वंचितच्या पदाधिकाऱ्यांकडून आई-वडिलांसह सत्कार

संजय तायडे

बोरगाव मंजू :  परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवता येते, याचा प्रत्यय अकोला तालुक्यातील धोर्तडी येथील मोनाली दीपक आठवले हिने देऊन दाखवला आहे. प्लंबिंग कामावर मजुरी करणाऱ्या वडिलांची मुलगी असलेल्या मोनालीने कोणतीही ट्युशन न लावता एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करत कर सहाय्यक अधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे.

मोनालीची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. वडील दीपक आठवले हे गावात नळ फिटिंग व मजुरीचे काम करतात, तर आई शेतीमजुरी करते. मोनालीचे प्राथमिक शिक्षण धोर्तडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण अकोला येथील जिल्हा परिषद कन्याशाळेत पूर्ण झाले. तिने शिष्यवृत्तीच्या आधारावर एम.कॉम.पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले.

घरची परिस्थिती प्रतिकूल असतानाही मोनालीने कोणतीही कोचिंग क्लास न लावता स्वअभ्यासाच्या जोरावर एकाच वेळी तीन स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केल्या. यात समाज कल्याण विभागातील लिपिक, उच्च न्यायालयातील बेलिफ आणि विक्रीकर विभागातील कर सहाय्यक अधिकारी या पदांचा समावेश आहे. या तिन्ही पदांपैकी मोनालीने कर सहाय्यक अधिकारी पद स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

या उल्लेखनीय यशाची दखल घेत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील फाटकर यांनी धोर्तडी येथे जाऊन मोनाली व तिच्या आई-वडिलांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. “अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले हे यश गावासह समाजातील सर्व गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी अमित खंडारे, प्रदीप पळसपगार, हिम्मत वानखडे, प्रमोद वानखडे, सुधाकर मालठाणे, सुरेश गवळी, माजी उपसरपंच परेश ढवळे, राजू बिलेवार, संजय किर्तक, उमेश वानखडे, ज्ञानेश्वर वानखडे, राहुल वानखडे, प्रतीक आठवले, उमेश देवतळे यांच्यासह अनेक गावकरी उपस्थित होते.

सत्कारप्रसंगी बोलताना मोनाली आठवले म्हणाली की, “माझे वडील दीपक आठवले हे प्रकाश आंबेडकर यांच्या चळवळीत सुरुवातीपासून सक्रिय असल्यामुळे आमच्या घरात आंबेडकरी विचार रुजले. त्याच विचारांमुळे मनात जिद्द निर्माण झाली आणि हे यश संपादन करता आले.”

जि.प.सीईओंची ग्रामपंचायत कोळंबीला भेट; सेवाकार्यातील कार्यक्षमतेचे कौतुक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top