Mahabreaking

[breaking_news]

Dr. Vishal Yedwar :मूर्तिजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा ; विदर्भ कबड्डी फेडरेशनच्या सचिवपदी डॉ. विशाल येदवर

Dr. Vishal Yedwar : क्रीडा क्षेत्रातून शहरासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. स्थानिक क्रीडाप्रेमी व कुशल संघटक म्हणून ओळख असलेल्या डॉ. विशाल येदवर यांची विदर्भ कबड्डी फेडरेशनच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे विदर्भातील कबड्डी वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dr. Vishal Yedwar

संजय उमक

मूर्तिजापूर : क्रीडा क्षेत्रातून शहरासाठी अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. स्थानिक क्रीडाप्रेमी व कुशल संघटक म्हणून ओळख असलेल्या डॉ. विशाल येदवर यांची विदर्भ कबड्डी फेडरेशनच्या सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे विदर्भातील कबड्डी वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे पार पडलेल्या फेडरेशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अखिल भारतीय कबड्डी फेडरेशनचे सचिव जितूभाऊ ठाकूर यांच्या हस्ते डॉ. येदवर यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली. खेळाप्रती असलेली तळमळ, संघटन कौशल्य आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळवून देण्याचा त्यांचा ध्यास लक्षात घेता, त्यांच्या निवडीकडे अपेक्षेने पाहिले जात आहे.

दरम्यान, त्यांच्या निवडीचे औचित्य साधून माई बहुउद्देशीय क्रीडा मंडळ व मित्रपरिवारातर्फे जल्लोष करण्यात आला. डॉ. येदवर यांच्या नेतृत्वात विदर्भातील कबड्डीला नवी दिशा मिळेल, तसेच ग्रामीण भागातील गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवडीबद्दल शेखरभाऊ येदवर, संतोष चौधरी, जावेद खान, दिवाकरभाऊ काटे, पिंटू वानखडे, स्वप्निल जामनीक, शाम येवले, भरत वानखडे, सतीश शेंद्रे, राहुल आष्टीकर, आशिष नवघरे, पिंटू येदवर, गणेश पांढन, दर्शन येदवर, राहुल येदवर, संग्राम येदवर, विनोद गांजाळे, ऋषिकेश शिंदे, मंथन सावळे, अल्बक्ष शाह यांच्यासह समस्त मित्रपरिवाराने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top