Mahabreaking

[breaking_news]

Priya Kharat :अंगणवाडी सेविका प्रिया खरात  राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत

Priya Kharat : ग्रामीण भागातील बालकांच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत  तांदुळवाडी (रुम्हणा) येथील अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांना २०२६ चा राज्यस्तरीय  शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Priya Kharat

दुसरबीड : ग्रामीण भागातील बालकांच्या विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत  तांदुळवाडी (रुम्हणा) येथील अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर प्रकाश खरात यांना २०२६ चा राज्यस्तरीय  शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

हा सोहळा आश्रयआशा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. संस्थापक सचिव आशाताई (अलका) बच्छाव यांनी प्रिया खरात यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची निवड केली. २५ एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमात मा. प्रतापराव दिघावकर (माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व लोकसेवा आयोग सदस्य), डॉ. अमोल शेझवळ, प्रा. सी. डी. रोटे, संजय देशमुख (संस्थापक अध्यक्ष, साईधनवर्षा फाउंडेशन) तसेच जगन्नाथ पंडित बच्छाव आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रिया खरात यांनी M.Sc. (गणित), B.Ed., D.Ed. अशी उच्च शैक्षणिक पात्रता मिळवली आहे. चांगल्या वेतनाच्या नोकरीच्या संधी उपलब्ध असूनही त्यांनी ग्रामीण भागातील बालकांच्या घडणीत योगदान देण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तांदुळवाडी येथील अंगणवाडी केंद्राने जिल्ह्यात विशेष नावलौकिक मिळवला आहे.जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत राबविण्यात आलेल्या ‘कुशल अंगणवाडी’ उपक्रमात सुमारे २६ हजार बालकांची चाचणी घेण्यात आली होती. या उपक्रमातही त्यांच्या केंद्राने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.प्रिया खरात यांच्या या यशामुळे तांदुळवाडीसह संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्याचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या कार्याबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असून, ग्रामीण भागातील इतर अंगणवाडी सेविकांसाठी त्या प्रेरणादायी ठरत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top