Mahabreaking

[breaking_news]

Online Census Begins :ऑनलाइन जनगणनेला सुरुवात ; स्वतः करा जनगणना; नागरिकांना सहभागाचे आवाहन

Online Census Begins :या वर्षी होणारी जन गणना डिजीटल होणार असून पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

Online Census Begins

  दुसरबीड : या वर्षी होणारी जन गणना डिजीटल होणार असून पहिल्या टप्प्यात १ ते १५ मे दरम्यान नागरिकांना स्वयंगणना (Self Enumeration) करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

२०११ नंतर तब्बल १५ वर्षांनी ही जनगणना होत असून, यातून मिळणारी माहिती देशाच्या विकासासाठी तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांनी अधिकृत पोर्टलला भेट देऊन आपली माहिती स्वतः भरायची आहे. या प्रक्रियेत कुटुंब प्रमुखाचे नाव, १० अंकी मोबाईल क्रमांक आदी तपशील नोंदवावे लागतील. पोर्टलवर विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळख क्रमांक (आयडी) दिला जाईल. हा आयडी सुरक्षित ठेवणे आवश्यक असून, दुसऱ्या टप्प्यात प्रगणक घरभेटीला आल्यावर हा आयडी दिल्यास संबंधित माहिती अधिकृतपणे जनगणनेत नोंदवली जाईल.जनगणना प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असल्याने माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशनचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता आणि मालमत्ता यासंदर्भातील सविस्तर माहिती गोळा केली जाणार आहे.नागरिकांनी अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top