Mahabreaking

[breaking_news]

Illegal Meat Transport  :ऑटो रिक्षातून अवैध मांस वाहतुक ; वाहनासह दोघांना अटक!

Illegal Meat Transport  : ऑटो  रिक्षातून अवैध मांस वाहतुक करणाऱ्या दोघांना बोरगाव मंजू पोलिसांनी २६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ४० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Meat Transport

बोरगाव मंजूत पोलिसांची  नाकाबंदी दरम्यान मोठी कारवाई; गुन्हा दाखल

बोरगाव मंजू : ऑटो  रिक्षातून अवैध मांस वाहतुक करणाऱ्या दोघांना बोरगाव मंजू पोलिसांनी २६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी ४० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरगाव मंजू पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, एका प्रवासी ऑटो रिक्षामधून गोवंश मांसाची अवैध वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी जुन्या राष्ट्रीय महामार्गावर ग्राम सचिवालय कार्यालयाजवळ नाकाबंदी करून सापळा रचला. दरम्यान, अकोल्याकडे जाणारी एमएच ३० बीसी ०३७३ क्रमांकाची प्रवासी ऑटो रिक्षा थांबवून तिची झडती घेतली असता, ऑटोमधील एका पोत्यात सुमारे ४० किलो गोवंश मांस आढळून आले. या मांसाची अंदाजे किंमत आठ हजार रुपये असून, ऑटो रिक्षाची किंमत सुमारे एक लाख पंचवीस हजार रुपये आहे. असा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी शेख करीम शेख दुल्हा (रा. बोरगाव मंजू) व मोहम्मद कासम मोहम्मद फारुख (रा. अकोला) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे व पोलीस कर्मचारी आकाश जंजाळ यांनी केली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top