Speeding Two-Wheeler and Car : भरधाव दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर झाले. ही घटना बाळापुर तालुक्यातील बाग फाटा नजीक रविवारी दुपारी १२:३० च्या सुमारास घडली आहे.

बाळापूर तालुक्यातील बाग फाटा नजीकची घटना
राहुल सोनोने
वाडेगाव: भरधाव दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण गंभीर झाले. ही घटना बाळापुर तालुक्यातील बाग फाटा नजीक रविवारी दुपारी १२:३० च्या सुमारास घडली आहे.
मध्यप्रदेशातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी गजाआड
बाळापूर ते वाडेगाव मार्गावर बाग फाटा जवळ बटवाडीवरून मुख्य मार्गावर येत असलेल्या दुचाकीची वाडेगावकडे जात असलेल्या कारची धडक समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर ग्रामस्थांनी जखमींना उचलून १०८ रुग्ण वाहिकेला पाचारण करून रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच धनेगावचे पोलीस पाटील प्रमोद लांडे यांनी जखमींना मदत करून पुढील उपचारासाठी पाठविले .या घटनेची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे. जखमींवर तातडीने बाळापूर येथे उपचासाराठी पाठवण्यात आले.

