Grand Dhamma Rally: द्ध पौर्णिमा निमित्त बुलढाणा शहरात भव्य धम्म रॅलीचे आयोजन 1 मे रोजी करण्यात आले आहे. या रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातूंचे दर्शन शहरवासीयांना घडणार आहे.

समता-करुणेचा संदेश घेऊन शहरात धम्म प्रदक्षिणा; हजारोंच्या उपस्थितीची अपेक्षा
बुलढाणा : बुद्ध पौर्णिमा निमित्त बुलढाणा शहरात भव्य धम्म रॅलीचे आयोजन 1 मे रोजी करण्यात आले आहे. या रॅलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिधातूंचे दर्शन शहरवासीयांना घडणार आहे.
त्रिविध पावनी वैशाख पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा अत्यंत महत्त्वाचा उत्सव मानला जातो. याच दिवशी भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटना घडल्यामुळे या दिवसाला विशेष धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मलकापूर रोडवरील डॉ. आंबेडकर नगर येथील महापुरुषांच्या पुतळ्यांपासून धम्म रॅलीला प्रारंभ होणार आहे. रॅलीत बाबासाहेबांच्या अस्थिधातूंची शहरभर नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार असून, नागरिकांना दर्शनाची संधी उपलब्ध होणार आहे.
या पवित्र दिवशी भगवान बुद्धांनी दिलेल्या करुणा, समता व प्रज्ञेच्या संदेशाची आठवण करून देत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतेवर आधारित विचारांना उजाळा देण्याचा उद्देश या रॅलीमागे आहे. अस्थिधातूंच्या दर्शनातून समाजात सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा व सामाजिक बांधिलकी वाढीस लागेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक धम्म रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बुलढाणा शहरातील बौद्ध उपासक-उपासिका तसेच ‘दि बुद्धिस्ट ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आले आहे.

