Mahabreaking

[breaking_news]

Ramgopal Jaiswal Passes Away :साखरखेर्डा येथील न्यायदानाचा दिप मालवला , रामगोपाल जैस्वाल यांचे निधन 

Ramgopal Jaiswal Passes Away : साखरखेर्डा आणि पंचक्रोशीतील एक नावाजलेले व्यक्तीमत्व , कोणताही वाद असो , तंटा असो योग्य न्याय देण्याची वृत्ती जोपासणारे चालता बोलता न्याय दानाचा दिप स्तंभ श्री रामगोपाल हिरालाल जैस्वाल यांचे ९९ व्या वर्षी वृद्धापकाळाने २४ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता निधन झाले .

Ramgopal Jaiswal Passes Away

अशोक इंगळे

साखरखेर्डा : साखरखेर्डा आणि पंचक्रोशीतील एक नावाजलेले व्यक्तीमत्व , कोणताही वाद असो , तंटा असो योग्य न्याय देण्याची वृत्ती जोपासणारे चालता बोलता न्याय दानाचा दिप स्तंभ श्री रामगोपाल हिरालाल जैस्वाल यांचे ९९ व्या वर्षी वृद्धापकाळाने २४ एप्रिल रोजी रात्री ९:३० वाजता निधन झाले .

साखरखेर्डा येथील राजकीय पटलावर नेतृत्व करणारे रामगोपाल जैस्वाल , भाऊसाहेब सावजी , हाजी यासिन सौदागर कुरेशी , पुरुषोत्तम दादा शुक्ल, पांडूजी खरात , विठोबा दसरे ही मंडळी होती . गावातील शेतीचा  , धुऱ्याचा , राजकीय वाद असो ही मंडळी बसून सोडवित असतं. आज जुन्या काळातील एकही हिरा ह्यात नाही . परंतू आजही त्यांची आठवण स्मरणात राहील अशीच आहे . रामगोपाल हिरालाल जैस्वाल यांनी सामाजिक कार्यात सतत कार्यरत राहून काम करीत असताना योग्य न्याय देण्याची भूमिका बजावली . १५ वर्ष ग्रामपंचायत सदस्य असताना सरपंच कोणाला करायचे असा हुकुमी एक्का म्हणून त्यांची ख्याती होती . श्री गणेश उत्सव मिरवणूक असो की दुर्गादेवी उत्सव असो , विजयादशमीला निघणारी सिमोलंघण मिरवणूक असो रामगोपाल जैस्वाल हे अग्रस्थानी असायचे . सहा फुट उंची , धिप्पाड छाती , पिळदार मिशा , शरीराला शोभेल असा पेहराव त्यामुळे दादा आले . असा इशारा अनेकांना दिलासा मिळायचा . ९९ वर्षांपर्यंत वृत्तपत्र वाचन त्यांनी केले . तल्लख बुद्धी असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना नावासह आवाज देऊन खुशाली विचारायचे . भाजप , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते नेते होते . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक राष्ट्रीय अधिवेशनात त्यांचा सहभाग राहिला आहे . विधानसभा निवडणूक असो की लोकसभा निवडणूक असो रामगोपाल जैस्वाल जो पर्यंत सांगत नाही तोपर्यंत मतदारांचा निर्णय होत नसे . हिंदू समाजावर त्यांचे एवढे प्रभुत्व होते की राजकीय असो की सामाजिक संकट ओढावले तर दादा सर्वांच्या समोर असायचे . त्यामुळे त्यांचा शब्द प्रमाण मानायचे  . त्यांना चार मुले आणि तीन मुली होत्या . त्यापैकी श्रीराम , सुभाष , भैय्यालाल या तीन मुलांचे अकाली निधनामुळे ते खचले असले तरी नातू यांना व्यावसायीक क्षेत्रात उतरवून , हळूहळू राजकीय क्षेत्रात त्यांचे पदार्पण केले . राजू हा मुलगा , तीन बहिणी आणि पत्नी व नातू असा मोठा परिवार त्यांच्यामागे आहे .

युवकाच्या खून प्रकरणातील आणखी दोन आरोपी गजाआड, मेहकर पोलिसांची कारवाई

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top