World Malaria Day : जिल्हा हिवताप कार्यालय, बुलढाणा येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त २५ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माझं गाव मलेरियामुक्त गाव चा संकल्प करण्यात आला. तसेच मलेरिया, डेंगू व इतर किटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी शपथ घेण्यात आली.

आरोग्य कर्मचाऱ्यांचा गौरव : कार्यक्रमातून जनजागृतीचा संदेश
बुलढाणा : जिल्हा हिवताप कार्यालय, बुलढाणा येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त २५ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात माझं गाव मलेरियामुक्त गाव चा संकल्प करण्यात आला. तसेच मलेरिया, डेंगू व इतर किटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी शपथ घेण्यात आली.
५ किलो गांजासह अल्पवयीन ताब्यात, देऊळगाव राजात खळबळ

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. हरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपस्थित यावेळी डॉ. रणजीत मंडाले (अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा) डॉ. महेंद्र सरपाते (तालुका आरोग्य अधिकारी, बुलढाणा) , शिवराज चौहान (जिल्हा हिवताप अधिकारी) ,पांडे (सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी) , राजेश धुताडमल (जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी) तसेच आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य कर्मचारी (पुरुष/स्त्री) व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सन २०२५ मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मलेरिया विभागामार्फत प्रशस्तिपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. महेंद्र सरपाते (तालुका आरोग्य अधिकारी, बुलढाणा) यांचा विशेष समावेश होता. कार्यक्रमादरम्यान सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मलेरिया, डेंगू व इतर किटकजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी शपथ घेतली व जनजागृतीचा संदेश दिला. संचालन प्रदीप वणारे व आभार प्रदर्शन सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पांडे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा हिवताप कार्यालयाचे सर्व कर्मचारी व बुलढाणा शहर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .

