Mahabreaking

[breaking_news]

Speeding Car Collides with Two-Wheeler :भरधाव कार दुचाकीची धडक, दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी

Speeding Car Collides with Two-Wheeler : भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. ही घटना २5 एप्रिल रोजी अकोला-पातूर महामार्गावर कापशीजवळ घडली.  धाकट्या भावाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी निघालेले जात असताना हा अपघात घडला. अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

Speeding Car Collides with Two-Wheeler

अकोला-पातूर मार्गावर भीषण अपघात;  लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी जात असताना घडला अपघात

राहुल सोनोने

वाडेगाव : भरधाव कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दोन सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. ही घटना २5 एप्रिल रोजी अकोला-पातूर महामार्गावर कापशीजवळ घडली.  धाकट्या भावाच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी निघालेले जात असताना हा अपघात घडला. अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले.

कापशीपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. अपघाताच्या वेळी घटनास्थळी पोलीस उपलब्ध नव्हते, मात्र उपस्थित नागरिकांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला. जखमींना तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची भीषणता मोठी होती, मात्र जखमींना नेमकी किती आणि कुठे मार लागला याबाबत समजू शकलेले नाहीत. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दोघांचीही प्रकृती चिंताजनक दिसत होती. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अहवालानंतरच दुखापतीचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल.

आनंदाच्या वातावरणात चिंता

जखमी तरुणांकडे लग्नाच्या पत्रिका आढळून आल्या असून, २९ एप्रिल रोजी घरात विवाह सोहळा आहे. घराचे अंगण लग्नाच्या लगबगीने न्हाऊन निघाले असतानाच, पत्रिका वाटायला गेलेल्या मुलांचा अपघात झाल्याची बातमी समजताच कुटुंबावर चिंतेचे सावट पसरले आहे. या घटनेमुळे अकोला-पातूर मार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना स्थानिक नागरिक करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top