Mahabreaking

[breaking_news]

Multi-crore Forensic Van :कोट्यवधींची फॉरेन्सिक व्हॅन ‘धक्का स्टार्ट’वर; पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Multi-crore Forensic Van :गुन्हे तपासाला गती देण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जलद छडा लावण्यासाठी प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन खरेदी केल्या. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या व्हॅनना हिरवी झेंडी दाखवत त्यांचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात या व्हॅनची आजची अवस्था पाहता सगळाच गाजावाजा फोल ठरल्याचे चित्र समोर आले आहे.

Multi-crore Forensic Van

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गाजावाजा फुसका; देखभाल अभावी व्हॅन ठप्प

संजय उमक

मूर्तिजापूर : गुन्हे तपासाला गती देण्यासाठी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जलद छडा लावण्यासाठी प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन खरेदी केल्या. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात या व्हॅनना हिरवी झेंडी दाखवत त्यांचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात या व्हॅनची आजची अवस्था पाहता सगळाच गाजावाजा फोल ठरल्याचे चित्र समोर आले आहे.

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात या अत्याधुनिक फॉरेन्सिक व्हॅन सध्या अक्षरशः बंद अवस्थेत उभी असल्याचे दिसून येत आहे. गुन्हे तपासासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही यंत्रणा निष्क्रिय ठरत असल्याने तपास प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, या व्हॅन सुरू करण्यासाठी किंवा हलवण्यासाठी फॉरेन्सिक पथकातील कर्मचाऱ्यांनाच प्रत्यक्ष धक्का मारावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून खरेदी केलेल्या अत्याधुनिक वाहनांची ही अवस्था प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक मानली जात आहे.

या व्हॅनची नियमित देखभाल का झाली नाही? तांत्रिक बिघाड वेळेत का दुरुस्त करण्यात आला नाही? जबाबदारी निश्चित करण्यात का कुचराई झाली? असे एक ना अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत. एकीकडे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आधुनिक साधनसामग्रीचा गवगवा केला जातो, तर दुसरीकडे त्याच साधनांचा योग्य वापर आणि देखभाल करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे हे चित्र स्पष्ट करत आहे. आता या प्रकारावर वरिष्ठ अधिकारी नेमकी कोणती कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top