Jijamata Vidyalaya :परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे हक्काचे दालन म्हणून जिजामाता विद्यालयाची स्थापना केलेली असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र काम येथे केले जाते. अनावधानाने एखाद्या शिक्षकांकडून चुक झाली असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती संस्थेचे सचिव पंजाबराव हाडे यांनी दिली.

साखरखेर्डा : परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे हक्काचे दालन म्हणून जिजामाता विद्यालयाची स्थापना केलेली असून ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घडविण्याचे पवित्र काम येथे केले जाते. अनावधानाने एखाद्या शिक्षकांकडून चुक झाली असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती संस्थेचे सचिव पंजाबराव हाडे यांनी दिली. साखरखेर्डा येथील श्री सिध्देश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना सहकार महर्षी कै भास्करराव शिंगणे आणि महास्वामी पलसिध्द मठाचे मठाधिपती सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांनी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षणाचे दालन उपलब्ध व्हावे यामागची भूमिका आहे. श्री पलसिध्द महास्वामी मठात शेकडो विद्यार्थी आध्यात्मिक शिक्षणासाठी दाखल होतात. आध्यात्मिक शिक्षणासोबतच शालेय शिक्षण मिळावे म्हणून सर्व विद्यार्थ्यांना जिजामाता विद्यालयात प्रवेश दिला जातो. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. आज जिजामाता विद्यालयाचे अनेक विद्यार्थी उच्च पदस्थ अधिकारी , उच्च पदस्थ डॉक्टर , इंजिनिअर झाले आहेत . त्यांनी जिजामातेचा झेंडा अटकेपार नेला आहे . ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाहेर गावावरुन आलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष सिध्दलिंग शिवाचार्य महाराज त्यांची निवासाची आणि भोजनाची व्यवस्था मोफत करीत असतात. संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी महाराज श्रींचा सिहाचा वाटा आहे हे नाकारून चालणार नाही. आज सर्व संचालक मंडळ विद्यार्थी हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबवून सहकार्य करतात. पालक या नात्याने प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण देणं हे शिक्षकांचे कर्तव्य आहे . काल अनावधानाने एका शिक्षकांकडून चुक झाली . त्या चुकीला माफी नाहीच . संचालक मंडळ यावर निर्णय घेईल . परंतू यानंतर पुन्हा अशी चुक होणार नाही , याबाबत सर्व शिक्षकांना समज देण्यात आली आहे . पालक वर्गात जो काही गैरसमज झाला आहे त्याबद्दल मुख्याध्यापक आणि राजेंद्र पडघान यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे . असा खुलासा सचिव पंजाबराव हाडे , संचालक ललित अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे . तसेच श्री पलसिध्द महास्वामी मठाचे मठाधिपती सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांची सुध्दा माफी मागितली आहे .

