Mahabreaking

🔴 BREAKING
Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Leased Car Never Returned :भाडेतत्त्वावर दिलेली कार परतच दिली नाही, भाडेही थकविले ; दोघांवर गुन्हा Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले Akshaya Tritiya :अक्षय तृतीयेनिमित्त शिंदी येथे रामलीला सोंगाची परंपरा कायम Sushil Telgote Case :निळा जनउठावचा अकोल्यात एल्गार; सुशील तेलगोटे प्रकरणी न्यायासाठी जनआक्रोश Solve Murder Case : चार वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती

Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघुशंकेवरून येण्यास विलंब, शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोकेच फोडले

Teacher Fractures Seventh-Grade Student  : लघवी करून परत येण्यास विलंब झाला म्हणून राक्षसी प्रवृत्तीच्या शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोके डेस्कवर आपटले. यामध्ये विद्यार्थ्यांचे डोक फुटल्याने विद्यार्थी जखमी झाला. ही घटना साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयात दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली .

Teacher Fractures Seventh-Grade Student

साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयातील प्रकार; डेस्कवर आपटले डोके

साखरखेर्डा : लघवी करून परत येण्यास विलंब झाला म्हणून राक्षसी प्रवृत्तीच्या शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यांचे डोके डेस्कवर आपटले. यामध्ये विद्यार्थ्यांचे डोक फुटल्याने विद्यार्थी जखमी झाला. ही घटना साखरखेर्डा येथील जिजामाता विद्यालयात दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली .

येथील श्रीमज्जगदगुरु पलसिध्द महास्वामी मठात शिवपाठ शिकण्यासाठी राज्यातील अनेक विद्यार्थी येथे शिकत आहे . शिवपाठाबरोबर त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील साखरखेर्डा येथे झाले पाहिजे म्हणून बहुतांश विद्यार्थी हे शिवाचार्य रत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज जिजामाता विद्यालयाचे उपाध्यक्ष असल्याने जिजामाता विद्यालयात शिक्षण घेतात .  जिजामाता विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे म्हणून हे विद्यालय प्रसिद्ध आहे. असे असताना शिवपाठाचे शिक्षण घेणाऱ्या जिजामाता विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या अनिकेत सिध्देश्वर स्वामी रा.  मानकेश्वर ता. जिंतूर हा विद्यार्थी एका शिक्षकाची परवानगी घेऊन लघवीला गेला. परत आल्यावर वर्ग शिक्षक राजेंद्र पडघान यांनी त्यास कुठे गेला होता असे विचारले, क्षणार्धात त्या विद्यार्थ्यांचे डोके डेस्कवर आपटून जखमी केले. दरम्यान त्याचे डोके फुटून रक्तस्त्राव सुरु झाल्यावर वर्गातील स्वराज स्वामी , वेदांत भालेकर यांनी लागलीच शाळेच्या जवळ असलेल्या डॉ. योगेश झाल्टे यांचेकडे उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, दवाखान्यातून सदर विद्यार्थी भयभीत होऊन मठात आल्यावर शिवाचार्य रत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांना हकिकत सांगितल्यावर महाराजांनी शिक्षकाची कानउघडणी केली आहे . दरम्यान सदर राक्षसी वृत्तीच्या शिक्षकांबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. आईवडिलांना सोडून हे विद्यार्थ्या आपल्या गुरू माउलींच्या छत्राखाली मठात राहतात. अतीशय बेताची परिस्थिती असल्याने अशा विद्यार्थ्यांसाठी मठात मोफत शिक्षण देऊन निवासाची व्यवस्था केली जाते, असे असताना अशा विद्यार्थ्यांस शिक्षकाची राक्षसी वागणूक मिळत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

सकाळी जिजामाता विद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी जखमी अवस्थेत अनिकेत स्वामी ह्या विद्यार्थ्यांला माझ्याकडे उपचारासाठी आणले होते. तो रक्तस्त्राव झाल्याने घाबरला होता आता त्याची प्रकृती बरी आहे.

-डॉ योगेश झाल्टे, साखरखेर्डा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top