Rashtrasants 117th Village Birth Anniversary : अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी जि.अमरावती अंतर्गत बार्शीटाकळी तालुका गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने २५ एप्रिल रोजी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या ग्रामजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

बबन इंगळे
बार्शीटाकळी:-अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी जि.अमरावती अंतर्गत बार्शीटाकळी तालुका गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने २५ एप्रिल रोजी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या ग्रामजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
यामध्ये दिंडी शोभायात्रा, भजन संमेलन, सामुदायिक प्रार्थना ,राष्ट्रसंत कार्यगौरव पुरस्कार वितरण या सह विविध उपक्रम ग्रामजयंतीच्या पावन पर्वावर राबविण्यात येणार आहेत.विशेष म्हणजे या ग्रामजयंती निमित्त ह. भ. प. शुभम पोटेकर, कैवल्य ढोरे, अनुश्री धोत्रे ,चैताली तायडे ,समृद्धी डोके ,ईश्वरी नंदापुरे आदी बाल कीर्तनकारांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय कार्यकारणी सदस्य रवींद्र मुंडगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य गोपाळ महाराज उरळकर, प्रमुख म्हणून जिल्हा सेवाधिकारी शिवाजीराव म्हैसने ,जिल्हा प्रचार प्रमुख माणिकराव इंगळे गुरुजी, जिल्हा महिला सेवाधिकारी प्रीतीताई राऊत, तालुका महिला प्रमुख पुष्पाताई रत्नपारखी ,रामेश्वर बरगट,विजय प्रकाश रुहाटीया ,ठाणेदार प्रवीण धुमाळ ,नगरसेवक रमेश वाटमारे ,सविता वरगट आरती केदारे ,भारत बोबडे, कृषी भूषण मधुकर सरप, जीवन प्रचारक किशोर वाघ, डॉ. अशोक रत्नपारखी आदींची उपस्थिती लाभणार आहे. या ग्राम जयंती महोत्सवाचा गुरुदेव प्रेमींनी लाभ घेण्याचे आव्हान बार्शीटाकळी तालुका गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

