Mahabreaking

🔴 BREAKING
Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Solve Murder Case :तीन वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येचा मेहकर पोलिसांनी केला उलगडा Rashtrasants 117th Village Birth Anniversary :बार्शीटाकळीत राष्ट्रसंताचा ११७ वा ग्रामजयंती महोत्सव ! बाल कीर्तनकारांची उपस्थिती Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी Shyam Manav :जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून जनतेला अंधश्रद्धेच्या विळख्यातून वाचवा: श्याम मानव Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम

Cold water :बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात मिळणार थंड पाणी

Cold water : बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांसह बाहेरगावावरून बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची गत दशकांपासून भर उन्हाळ्यात मोफत तृष्णातृप्ती करण्यात येत आहे. पाणपोई लावून माणुसकी जोपासत तहानलेल्या माणसाची तहान भागवून खऱ्या अर्थाने समाजव्रत जोपासत जलसेवा हेच खरे सामाजिक कार्य आहे, असे प्रतिपादन मुर्तिजापूर नगरपरिषद बांधकाम सभापती संदीप सरनाईक यांनी व्यक्त केले.

Cold water

सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडेचा सामाजिक उपक्रम

 

बोरगाव मंजू : बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांसह बाहेरगावावरून बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची गत दशकांपासून भर उन्हाळ्यात मोफत तृष्णातृप्ती करण्यात येत आहे. पाणपोई लावून माणुसकी जोपासत तहानलेल्या माणसाची तहान भागवून खऱ्या अर्थाने समाजव्रत जोपासत जलसेवा हेच खरे सामाजिक कार्य आहे, असे प्रतिपादन मुर्तिजापूर नगरपरिषद बांधकाम सभापती संदीप सरनाईक यांनी व्यक्त केले.

स्थानिक बहुउद्देशीय संस्थाचे संस्था अध्यक्ष संजय वानखडे बोरगाव मंजू यांच्यावतीने आयोजित आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारात येणाऱ्या नागरिकांना मोफत थंड पाणी पाणपोई शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बांधकाम सभापती संदिप सरनाईक हे होते तर प्रमुख उपस्थिती पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, नगर परिषद सदस्या शुभांगी संदिप सरनाईक,ग्रामपंचायत सदस्य सुनील खेडकर, माजी पंचायत समिती सदस्य अशोक पाटील तायडे, संजय रडके, संजय देशमुख,अर्जृन बारस्कर,  आदी उपस्थित होते

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ११ वर्षांपासून उन्हाळ्यात आठवडी बाजारात लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे हे स्वखर्चाने दर मंगळवारी आठवडी बाजारात येणाऱ्या नागरिकांना थंड पाणी वाटप करण्याचा सामाजिक उपक्रम राबवतात. प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले, की खऱ्या अर्थाने अशा सामाजिक उपक्रमांची आज गरज आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते संजय वानखडे यांचे स्वागत केले.  प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयोजक संजय वानखडे यांनी केले, आभार पत्रकार तायडे गुरुजी यांनी केले

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top