Rajlakshmi International School : देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलने यंदाच्या एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल लावत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. १५ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेचा लौकिक वाढविला.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलने यंदाच्या एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल लावत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. १५ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या निकालात विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी यश संपादन करून शाळेचा लौकिक वाढविला.
विद्यालयातील ज्योतिरादित्य किंगर व शर्वरी शिंगाडे यांनी प्रत्येकी ९१ टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले. श्रुती दराडे ९०%, क्षितिज कायंदे ८९%, राजवीर गायकवाड ८९%, तन्वी वायाळ ८८.४%, राशी साकला ८७.२ %,मृणाल मोगल ८७.२%, वैभव जायभाये ८६.२%, महेश भुतेकर ८४.२%,तन्मय काकड ८४%, आदिती शिंगाडे ८३.२%, हर्षद धारतारकर ८३%, आरोही बहुरे ८२.२%, व लब्धी साकला ८२% या विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर उत्कृष्ट यश मिळवले. या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, नियोजनबद्ध अध्यापन आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत महत्त्वाची ठरल्याचे विद्यालयाच्या व्यवस्थापनाने सांगितले.
त्याचबरोबर मैथली तायडे या विद्यार्थिनीने इंग्रजी सारख्या विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त करून एक अभूतपूर्व यश संपादन केले आहे. मैथलीच्या या यशाने केवळ तिच्या कुटुंबाचीच नव्हे, तर शाळेची आणि परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे. इंग्रजी हा विषय अनेकांसाठी आव्हानात्मक मानला जातो, मात्र मैथलीने सातत्यपूर्ण अभ्यास, अवांतर वाचन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मैथलीने मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. शाळेच्या वतीने तिचा विशेष सत्कार जाहीर केला असून, “मैथली ही अत्यंत कष्टाळू विद्यार्थिनी आहे, तिने मिळवलेले हे गुण इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील,” अशा शब्दांत डॉ. मीनलताई शेळके यांनी तिचे कौतुक केले. तसेच या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थापक डॉ. रामप्रसाद शेळके यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्यामुळेच शाळेला सातत्याने उत्कृष्ट निकाल मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शाळेच्या अध्यक्षा डॉ. मीनलताई शेळके, संचालक सुजित गुप्ता, मुख्याध्यापिका डॉ. प्रियंका देशमुख , प्री- प्रायमरी व प्रायमरीच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा इंगळे तसेच उपमुख्याध्यापक निलेश गवई यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशामध्ये शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

