Rejects No-Confidence Motion :सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतीच्या सरपंच नलिनी गरड यांच्यावर ३० मार्च रोजी उपसरपंचासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता. तो पारीतही झाला होता . परंतू 16 एप्रिल रोजी ग्रामसभेत हा अविश्वास ठराव मांडला असता ग्रामसभेने हा ठराव फेटाळला आहे.

सरपंचपदी नलिनी गरड कायम ; ग्रामपंचायत सदस्यांनी पारीत केला होता अविश्वास प्रस्ताव
साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतीच्या सरपंच नलिनी गरड यांच्यावर ३० मार्च रोजी उपसरपंचासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता. तो पारीतही झाला होता . परंतू 16 एप्रिल रोजी ग्रामसभेत हा अविश्वास ठराव मांडला असता ग्रामसभेने हा ठराव फेटाळला आहे.
खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतीच्या सरपंच नलिनी गरड यांच्यावर ९ सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सरपंच कोणतेही निर्णय घेताना सदस्यांना विश्वासात घेत नाही . उलट जनहिताच्या विरोधात निर्णय घेत असल्यामुळे गावाच्या विकास कामांना खिळ बसली आहे, असा आरोप या सदस्यांनी केला होता . याशिवाय प्रशासनात अभाव, विकास कामातील अनियमितता , सदस्यांना असहकार्याचा अभाव , ग्रामपंचायत मधील कारभारात पारदर्शकतेचा अभाव असे आरोप करण्यात आले होते . ३० मार्च रोजी विद्या संजय लहाने , प्रकाश रामभाऊ गरड , नंदा श्रीकृष्ण तळेकर , दत्तू त्र्यंबक तळेकर , अलका सुधाकर नागरे , जनार्दन विक्रम नागरे , मिनाक्षी विनोद म्हस्के , सुनिता सुरेश भालेकर , स्वाती शिवानंद खेडेकर या ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता . तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता . परंतू नलिनी गरड ह्या जनतेतून निवडून आलेल्या सरपंच असल्याने तहसीलदार अजित दिवटे यांनी १६ एप्रिल रोजी खैरव बारलिंगा गट ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेऊन सदर अविश्वास ठराव ग्रामसभेत मांडला . अविश्वास ठरावाच्या बाजूने १५१ मते पडली . तर अविश्वास ठरावाच्या विरोधात १९० मते पडली . त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य यांनी आणलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत फेटाळण्यात आला. सरपंच यांना ३९ मते अधिक मिळाली . सरपंचपदी नलिनी राजेंद्र गरड कायम राहिल्याने उपस्थितांनी गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला .

