Mahabreaking

🔴 BREAKING
Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग? Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग?

Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग?

Sand Mafia  : खडकपूर्णा नदी पात्र आणि धरण परिसरात रेती माफीयांचा हैदोस सुरू आहे. विशेष म्हणजे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी सातत्यपूर्ण कारवाया करीत आहेत तर दुसरीकडे  रेती तस्करांनी प्रशासनापेक्षा एक पाऊल पुढे टाकत महसूल विभागातील काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आपले जाळे अधिक मजबूत केल्याचे चित्र दिसत आहे. वरिष्ठ अधिकारी कारवाईत व्यस्त असताना काही कर्मचारी मात्र ‘मलाई’ जमा करण्यात दंग असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Sand Mafia

कारवाईसाठी जाणाऱ्या पथकाची आधीच माहिती पोहचते रेती माफीयांपर्यंत

गजानन तिडके

देऊळगाव राजा : खडकपूर्णा नदी पात्र आणि धरण परिसरात रेती माफीयांचा हैदोस सुरू आहे. विशेष म्हणजे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी सातत्यपूर्ण कारवाया करीत आहेत तर दुसरीकडे  रेती तस्करांनी प्रशासनापेक्षा एक पाऊल पुढे टाकत महसूल विभागातील काही कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या संगनमताने आपले जाळे अधिक मजबूत केल्याचे चित्र दिसत आहे. वरिष्ठ अधिकारी कारवाईत व्यस्त असताना काही कर्मचारी मात्र ‘मलाई’ जमा करण्यात दंग असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Sand Mafia

महसूल विभागाकडून अवैध रेती तस्करी रोखण्यासाठी पथके स्थापन करण्यात आली असली, तरी या पथकांतीलच काही सदस्य अधिकाऱ्यांच्या हालचालींची माहिती गुप्तपणे तस्करांपर्यंत पोहोचवत असल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पथकांचे प्रयत्न अनेकदा निष्फळ ठरत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

विशेष म्हणजे, विभागातील कोणते कर्मचारी तस्करांना सहकार्य करतात याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना असल्याची चर्चा असूनही, त्यांच्यावर ठोस कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांतून आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील खडकपूर्णा नदी पात्र आणि धरण परिसर हा अवैध रेती तस्करीचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. येथे दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. काही कर्मचाऱ्यांच्या मौन संमतीमुळे तस्करांना अक्षरशः ‘हिरवे कुरण’ उपलब्ध झाले असून “तेरी भी चुप, मेरी भी चुप” अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका होत आहे.

महिला अधिकारी कार्यरत असल्याचा काही महसूल कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जात असल्याचीही चर्चा आहे. तस्कर बहुतांश वेळा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेतात. अशा वेळी कारवाई करताना महिला अधिकाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तरीही त्या धाडसीपणे कारवाई करत असल्या, तरी काही कर्मचारी आतूनच माहिती लीक करत असल्याने कारवाईवर परिणाम होत असल्याचे बोलले जाते.

 टिप्परसह पाच ब्रास रेती केली जप्त, तहसीलदारांच्या पथकाची कारवाई

दरम्यान, तहसीलदार वैशाली डोंगर-जाळ यांनी आपल्या पथकासह १८ तारखेला सायंकाळी खडकपूर्णा धरण परिसरात कारवाई करत एमएच २८ बीए ७२२२ क्रमांकाचा टिप्पर पकडला. या टिप्परमध्ये सुमारे पाच ब्रास अवैध रेती आढळून आली. संबंधित वाहन जप्त करून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. या कारवाईत महसूल सेवक कविता खरात आणि विठ्ठल हरणे यांनी सहकार्य केले. अवैध रेती तस्करीला आतूनच खतपाणी घालणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी होणार? प्रशासन या ‘अंदरूनी’ गळतीवर लगाम कधी लावणार? असे सवाल आता जनतेतून जोर धरू लागले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top