Mahabreaking

🔴 BREAKING
Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Minor Girl Sentenced :अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मारहाण करणाऱ्या आरोपीस पाच महिने कारावास Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव  

Private Bus Accident;समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी

Private Bus Accident; समृद्धी महामार्गावर मेहकरजवळील फर्जापूर टोल नाक्यावर खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बस चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले असल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

Private Bus Accident;

चालक वाहक काढत होते रिल्स, नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

डोणगाव : समृद्धी महामार्गावर मेहकरजवळील फर्जापूर टोल नाक्यावर खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बस चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात गुंतले असल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
या अपघातात दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त बस दुसऱ्या एका कारवर आदळल्याने त्या कारचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर जखमींना तात्काळ मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे सुमारे एक तास डॉक्टर उपस्थित नसल्याने जखमींच्या नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुसदकडे जाणारी ही खाजगी बस सकाळी सहाच्या सुमारास अपघातग्रस्त झाली. चालक आणि वाहक मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त असल्याने अपघात झाल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी केला आहे. सध्या गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top