Mahabreaking

🔴 BREAKING
Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड Samata Parva :बार्शीटाकळीत भीम गीतांचा समता पर्व कार्यक्रम;गितांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार   Bhim Jayanti! :बार्शीटाकळी शहरात भीम जयंती निमित्त विविध उपक्रम ! Saint Goroba Kaka Kumbhar :साखरखेर्डा येथे संत गोरोबा काका कुंभार यांना अभिवादन Census Preparations Complete: जनगणनेची तयारी पूर्ण; नागरिकांनी ऑनलाइन स्व-गणनेत सहभागी व्हावे : डोंगरजाळ   Robbery Case :बायगाव बु. येथील जबरी चोरीचा उलगडा; तिघे गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त  illegal Kharra :कुरुम येथे अवैध खर्रा तयार करुन विक्री करणारे तिघे गजाआड Samata Parva :बार्शीटाकळीत भीम गीतांचा समता पर्व कार्यक्रम;गितांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार   Bhim Jayanti! :बार्शीटाकळी शहरात भीम जयंती निमित्त विविध उपक्रम ! Saint Goroba Kaka Kumbhar :साखरखेर्डा येथे संत गोरोबा काका कुंभार यांना अभिवादन

Samata Parva :बार्शीटाकळीत भीम गीतांचा समता पर्व कार्यक्रम;गितांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार 

Samata Parva : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करुणाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था बार्शीटाकळीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त १६ एप्रिल रोजी भीम वाटिका परिसरात समता पर्व या भीम गीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

Samata Parva

बार्शीटाकळी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करुणाई बहुउद्देशीय शिक्षण संस्था बार्शीटाकळीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त १६ एप्रिल रोजी भीम वाटिका परिसरात समता पर्व या भीम गीत गायनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात ॲड. नीलूताई सराटे यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या वाचनाने करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, प्रशासकीय अधिकारी, नगरपंचायत कर्मचारी, पत्रकार व पोलीस प्रशासन यांचा पर्यावरणपूरक पद्धतीने सत्कार करण्यात आला. भीम-बुद्ध गीतांच्या माध्यमातून प्रबोधनपर कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये मुख्य गायिका रंजीता जवंजाळ, कीबोर्ड वादक सुरेश गायकवाड, तबलावादक गणेश तडसे, ढोलक वादक खैर मोहम्मद , अँक्टोपॅड वादक सुनील कदम , साऊंड सिस्टीम संयोजन विनय ठाकूर यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन प्रितेश गवई, सुनील जाधव यांनी केले. सदर कार्यक्रमातून संविधानाच्या मूल्यांची जपणूक व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार गीतांच्या माध्यमातून करण्यात आला. बार्शीटाकळी येथे प्रथमच संगीतमय पद्धतीने आंबेडकर जयंती साजरी करण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम ॲड. नीलूताई सराटे यांच्या समतापर्व २०२६या संकल्पनेतून करुणाई बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. नागरिकांनी संगीतमय भिमजन्म सोहळ्याला उस्फुर्त प्रतिसाद दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top