The thieves have crossed all limits : तालुक्यातील जवळखेड शिवारात चोरट्यांचा हैदोस सुरू असून शेतातील साहित्य लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. एका शेतकऱ्याच्या शेततळ्यातील तब्बल १ लाख ५० हजार रुपये किमतीची ताडपत्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.

शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान;अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील जवळखेड शिवारात चोरट्यांचा हैदोस सुरू असून शेतातील साहित्य लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत. एका शेतकऱ्याच्या शेततळ्यातील तब्बल १ लाख ५० हजार रुपये किमतीची ताडपत्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
फिर्यादी सतीश धनंजय कायंदे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या शेतात पाणी साठवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या शेततळ्यात कोहीनूर कंपनीची ८०० बाय २५ फूट आकाराची ताडपत्री टाकण्यात आली होती.
दरम्यान, १० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी ही ताडपत्री लंपास केली. सध्या शेततळ्यातील पाणी कमी झाल्याने ताडपत्री उघडी पडली होती, याचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा क्रमांक १६८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. , पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करत आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतीसाठी आवश्यक साहित्यावरच चोरट्यांचा डोळा असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

