Mahabreaking

[breaking_news]

Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Fire broke : लोंबकळलेल्या तारांच्या घर्षणाने ठिणगी पडून लागलेल्या आगीत साडे चार एकरातील मका जळून खाक झाला. ही घटना डोणगाव पासून जवळच असलेल्या आदर्श गाव पांगरखेड येथे १५ एप्रिलच्या सकाळी साडेसात वाजता घडली. या आगीत विधवा शेतकरी महिलेचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

Fire broke

मेहकर तालुक्यातील पांगरखेड येथील घटना; महावितरणवर निष्काळजीपणाचा आरोप

डोणगाव : लोंबकळलेल्या तारांच्या घर्षणाने ठिणगी पडून लागलेल्या आगीत साडे चार एकरातील मका जळून खाक झाला. ही घटना डोणगाव पासून जवळच असलेल्या आदर्श गाव पांगरखेड येथे १५ एप्रिलच्या सकाळी साडेसात वाजता घडली. या आगीत विधवा शेतकरी महिलेचे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले.

पांगरखेड येथील शालूबाई कडुजी वाकुडे यांनी शेत सर्वे नंबर १८  साडेचार एकरामध्ये मका पिकाची लागवड केली होती. कापणी करून मक्याच्या कणसांची गंजी मारून ठेवली होती. या सुडीवरूनच महावितरणची वीजवाहिनी गेली आहे. या तारा लोंबकलेल्या होत्या.  १५ एप्रिलच्या सकाळी साडेसात वाजता तारांचे घर्षण होऊन गंजीवर ठिणग्या पडून आग लागली. आगीत मक्याची संपूर्ण सुडी जळून खाक झाली. हाता-तोंडाशी आलेले पीक आगीत राख झाले.

या घटनेमुळे शेतकरी महिलेचे मोठे आर्थिक  नुकसान झाले आहे आहे. शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.  सदर घटनेची माहिती पडताच ग्राम महसूल अधिकारी बालाजी तिडके , महसूलसेवक भगवान बघे यांनी पंचनामा केला. आगग्रस्त शालूबाई वाकुडे यांना नुकसानभरपाई देण्यात यावी; अन्यथा महावितरण कंपनीवविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा परिसरातील शेतकऱ्यानी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top