mahabreaking.com

Kabaddi matches : पाचरण येथे रंगले कबड्डी सामने; बक्षिसांची लयलूट, विविध संघांचा सहभाग

Kabaddi matches : पातूर तालुक्यातील पाचरण येथे श्री गणेश उत्सवानिमित्त ५३ किलो गटातील दोन दिवसीय कबड्डी स्पर्धांचे दणदणीत सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धांची सांगता गुरुवारी झाली.यामध्ये छत्तीसगड राज्यातून एक कबड्डी संघ तर महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वाशीम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यांतील अनेक कबड्डी संघांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

Kabaddi matches

राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील पाचरण येथे श्री गणेश उत्सवानिमित्त ५३ किलो गटातील दोन दिवसीय कबड्डी स्पर्धांचे दणदणीत सामने आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धांची सांगता गुरुवारी झाली.यामध्ये छत्तीसगड राज्यातून एक कबड्डी संघ तर महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वाशीम, बुलढाणा, अकोला जिल्ह्यांतील अनेक कबड्डी संघांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या उद्घाटन व बक्षीस वितरणप्रसंगी युवा लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष अमोल घायवट, सुरेंद्र अवचार, लावण्य अतकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच पाचारण व जांब येथील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
या स्पर्धेत एकूण पाच बक्षिसे ठेवण्यात आली होती. त्यामध्ये पहिले बक्षीस वीर शिवाजी क्रीडा मंडळ, बिलासपूर (छत्तीसगड) यांना मिळाले. दुसरे बक्षीस जय मुंगसाजी संघ, अंधारसांगवी यांनी पटकावले. तिसरे बक्षीस वाशीम प्रशिक्षण संघ, वाशीम यांना मिळाले.
चौथे बक्षीस जय बजरंग संघ, पाचारण यांनी जिंकले. पाचवे बक्षीस जय बिरसा संघ, टिटवा यांनी पटकावले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top