Cattle Smugglers in Akola :जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात अकोला पोलिसांनी गोवंश तस्कारांविरुदध्द धडक कारवाई करीत ३२ गोवंशाना जिवनदान दिले. ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत ही कारवाई रविवारी भल्या पहाटेच करण्यात आली. या कारवाईमुळे गोवंश तस्कारांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षकांचा कारवाईत प्रत्यक्ष सहभाग: १३ लाख ७७ हजार रूपयांचा एवज केला जप्त
संजय तायडे
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात अकोला पोलिसांनी गोवंश तस्कारांविरुदध्द धडक कारवाई करीत ३२ गोवंशाना जिवनदान दिले. ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत ही कारवाई रविवारी भल्या पहाटेच करण्यात आली. या कारवाईमुळे गोवंश तस्कारांमध्ये खळबळ उडाली आहे.

अकोला जिल्हात गोवंश जातीचे जनावरांची वाहतुक करून कत्तली होत आहे. रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हददीत मोठया प्रमाणावर अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी आणले जात असल्याची माहीती मिळताच पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः गोवंश कारवाईची धुरा सांभाळली. गोवंश तस्करांवर अंकुश बसावा या करीता अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख पो. नि. शंकर शेळके व पो स्टे रामदास पेठ चे पो.नि.शिरीष खंडारे तसेच त्यांच्या अधिकारी व अमंलदार, आरसीपी यांचे संयुक्तरित्या वेगवेगळे पथक तयार करण्यात आली. या पथकांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कार्यवाही बाबत सुचना देवुन भल्या पहाटे घटनास्थळी धडक देवुन ऑपरेशन ‘प्रहार’ अंतर्गत गोवंश तस्करांवर कारवाई करण्यात आली.
पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः हजर राहुन त्यांचे अधिकारी व अमंलदार यांच्या वेगवेगळ्या पथकांनी रामदास पेठ येथील मच्छी मार्केट कत्तलखाना परिसरातुन वेगवेगळया ठिकाणाहुन गोवंश जातीचे गाय, गो-हे व कालवड असे जवळपास ३२ निदर्यतने बांधलेले गोवंश जप्त केले. जप्त गोवंश जातीचे जनावरे निर्दयतेने बांधुन ठेवल्याने त्यांची सुटका करून उपचार, देखरेख व संगोपणाकरिता आदर्श गौसेवा संस्था, म्हैसपुर जि. अकोला येथे दाखल करण्यात आले आहे.
ज्यांचे घर किंवा ताब्यातील जागेमधुन सदरील गोवंश जप्त करण्यात आले आहे अशा नमुद आरोपीतांवर पो स्टे रामदास पेठ येथे गुन्हे दाखल करून कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू आहे . आरोपी क. ०१) अब्दुल रहीम कुरेशी शेख हबीब कुरेशी रा. कागजीपुरा मजीद जवळ अकोला यांचे कडुन ०५ गोवंश कि.अ.२,३६,०००/- आरोपी कं.०२) जावेद खान कुरेशी रा. कागजीपुरा मस्जीद मागे अकोला यांचे कडुन ०५ गोवंश कि.अ.२,७०,०००/- आरोपी क्रं ०३) मोहम्मद मोसीन अब्दुल नजीर रा. मच्छी मार्केट अकोला यांचे कडुन ०५ गोवंश कि.अ.२,१५,०००/- आरोपी क्रं ०४) फिरोज कुरेशी शेख फकीरा रा. कागजीपुरा अकोला यांचे कडुन ०२ गोवंश कि.अ. १,०५,०००/- आरोपी कं.०५) शहजाद कुरेशी उर्फ सज्जु कुरेशी रा. इंदीरा नगर अकोट फेल अकोला यांचे कडुन ०५ गोवंश कि.अ. १,७४,०००/- आरोपी क्रं ०६) शेख फैयाज शेख महेबुब रा. मच्छी मार्केट अकोला यांचे कडुन ०५ गोवंश कि.अ. २,१५,०००/- आरोपी कं ०७) शेख मोबीन शेख मुनताज कुरेशी रा. कुरेशी ऑफीस मागे अकोला यांचे कडुन ०५ गोवंश कि.अ. १,६२,०००/- असा एकुन ३२ गोवंश जातीचे जनावरांचा कि.अं. १३ लाख ७७ हजार रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक, अकोला अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक, बी चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पो. नि. श्री. शंकर शेळके, स्थानीक गुन्हे शाखा अकोला, पो.नि.शिरीष खंडारे, पो.स्टे. रामदास पेठ, सपोनि विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव, माजीद पठाण, विष्णु बोडखे, रत्नदिप पळसपगार, निलेश गायकवाड, प्रदीप जोगदंड, स्थागुशा, पो.स्टे. रामदास पेठ येथील अमंलदार तसेच आरसीपी पथकाने पार पाडली.
पोलीस अधिक्षक, अकोला अर्चित चांडक यांनी गोवंश कार्यवाहीची स्वतः धुरा सांभाळत व स्वतः मैदानात उतरून आपल्या पथकांमार्फत गोवंश तस्करांवर केलेल्या या धडाकेबाज कार्यवाही मुळे अकोला शहरातील गोवंश तस्करांचे धाबे दणाणले असुन यापुढे कत्तली करीता गोवंश तस्करी करणा-या आरोपीतांविरूध्द प्रचलीत कायदयाने कठोर कार्यवाही करण्यात येईल अस इशारा पोलीस अधिक्षकांनी गोवंश तस्करानां दिला आहे.

