Mahabreaking

[breaking_news]

Accused who murdered :सासू- मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल

Accused who murdered : तालुक्यातील शेलूबाजार येथे घडलेल्या सासू आणि मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस  मंगरुळपीर सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत आजन्म कारावास (जन्मठेप ) व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.   सचिन धर्मराज थोरात (रा. पर्वती, पुणे)असे आरोपीचे नाव आहे. दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश वैभव व्ही. पाटील यांनी १० एप्रिल २०१६ रोजी सुनावला.

Accused who murdered

मंगरुळपीर:  तालुक्यातील शेलूबाजार येथे घडलेल्या सासू आणि मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस  मंगरुळपीर सत्र न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत आजन्म कारावास (जन्मठेप ) व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.   सचिन धर्मराज थोरात (रा. पर्वती, पुणे)असे आरोपीचे नाव आहे. दंड न भरल्यास एक वर्षाचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश वैभव व्ही. पाटील यांनी १० एप्रिल २०१६ रोजी सुनावला.

शेलूबाजार येथील पोलिस पाटील मदन तुकाराम जुंगाडे यांनी १३ मे २०२२ रोजी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, त्याच दिवशी सकाळी सुमारे ८ वाजता आरोपीने सासू निर्मलाबाई भिकाजी पवार आणि मेहुणी विजया गुंजावळे यांच्यावर लोखंडी सत्तुराने हल्ला केल्याची माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी घटनास्थळी गेले. तेथे दोघीही रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध पडलेल्या होत्या, तर आरोपी हातात शस्त्र घेऊन उभा होता.घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला तत्काळ ताब्यात घेतले. जखमींना शेलूबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले व पुढील उपचारासाठी वाशिमला हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघींनाही मृत घोषित केले. याप्रकरणी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पूर्ण करून तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक तुषार जाधव यांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. खटल्या दरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण १५ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्ष, वैद्यकीय अहवाल व इतर वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.सरकार पक्षाची बाजू अतिरिक्त शासकीय अभियोक्ता गोवर्धन गंगावणे यांनी मांडली, तर कोर्ट पैरवीसाठी एलपीसी सुवर्णा मनवर व पोलिस हवालदार राम नागूलकर यांनी सहाय केले.सदर कारवाई मध्ये तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुनिल हुड,पिएसआय मंजुषा मोरे,पिएसआय तुषार जाधव,पोलीस शिपाई गोपाल कवर, संदीप खडसे, ज्ञानेश्वर राठोड, सुनिल गंडाईत,ज्ञानेश्वर राठोड यांनी गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास केला. सर्व पुरावांच्या आधारे विद्यमान न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top