Mahabreaking

🔴 BREAKING
Accused who fled :युवकाचा खून करून पळणाऱ्या आरोपींना दोन तासात केले गजाआड World Homeopathy Day :बीबी ग्रामीण रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा Mahatma Phule Jayanti : डोणगावात रक्तदान करून महात्मा फुले जयंती साजरी Accused who murdered :सासू- मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल Employee Assaulted :बसस्थानकातील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण;एकाविरुध्द गुन्हा दाखल MLA Manoj Kayande :देऊळगाव राजातील जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते लोकार्पण Accused who fled :युवकाचा खून करून पळणाऱ्या आरोपींना दोन तासात केले गजाआड World Homeopathy Day :बीबी ग्रामीण रुग्णालयात जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा Mahatma Phule Jayanti : डोणगावात रक्तदान करून महात्मा फुले जयंती साजरी Accused who murdered :सासू- मेहुणीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; मंगरुळपीर सत्र न्यायालयाचा निकाल Employee Assaulted :बसस्थानकातील सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण;एकाविरुध्द गुन्हा दाखल MLA Manoj Kayande :देऊळगाव राजातील जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते लोकार्पण

MLA Manoj Kayande :देऊळगाव राजातील जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते लोकार्पण

MLA Manoj Kayande : शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्यात आले आहे. या येजनेंतर्गत आठवडी बाजारात उभारलेल्या जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते 11 एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.

MLA Manoj Kayande

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत  पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात

 देऊळगाव राजा : शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्यात आले आहे. या येजनेंतर्गत आठवडी बाजारात उभारलेल्या जलकुंभाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते 11 एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.

MLA Manoj Kayande

देऊळगाव राजा शहरासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा या दृष्टीने यापूर्वी सन २०१४ मध्ये सुजल निर्मल अभियानांतर्गत खडकपूर्णा जलाशयातून पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यात आलेली होती. मात्र शहरातील वितरण व्यवस्थेत अनेक तांत्रिक अडचणीमुळे शहरवासीयांना पाणी असूनही पाणी टंचाईचा सामना करावा लागायचा. यासाठी वितरण व्यवस्था व पाणी साठवण्यासाठी नवीन जलकुंभ उभारने आवश्यक होते.यासाठी रीतसर प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतर महाराष्ट्र सुवर्ण जयंती  नगरोथान महाभियान अंतर्गत 34 कोटी रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास 29 मार्च 23 रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली होती. या योजनेतील कामे अंतिम टप्प्यात असून 11 एप्रिल रोजी आठवडी बाजारामध्ये बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे लोकार्पण आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते विधीवत पूजन करून करण्यात आले व त्यांच्याच हस्ते या जलकुंभातील  पिण्याचे पाणी शहरवासीयांना नळाद्वारे देण्यात आले. यावेळी नगर अध्यक्ष माधुरी शिपने, उपाध्यक्ष वनिता भुतडा , गटनेते प्रदीप वाघ उपस्थित होते .

धरण उशाशी आणि करोड घशाशी अशी शहरवासी यांची अवस्था झालेली होती. खडकपूर्णा जलाशयात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना व शहरात मुबलक पाणी जल शुद्धीकरण केंद्रावर येऊन त्याचे वितरण होण्यामध्ये सदोष पाईप लाईन मुळे अनेक वर्षापासून तांत्रिक अडचणी न.प.समोर उभ्या आहेत. जोपर्यंत वितरण व्यवस्थेतील   त्रुटी दूर होऊ शकत नाही तोपर्यंत शहरवासीयांना मुबलक पाणी वेळेवर मिळणार नाही ही बाब हेरून मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी 34 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. यामध्ये खडकपूर्णा जलाशयात विहिरीजवळ  समांतर पूल बांधणे, स्वीच रूम बांधणे, शुद्ध जल पंपिंग मशनरी उभारणे तीन उंच जलकुंभ उभारणे, एक बैठा जलकुंभ ,62 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईन अस्तरणे ,8 mld चे नविन जल शुद्धीकरण केन्द्र उभारणे या बाबींचा समावेश करण्यात आला या प्रस्तावास शासनाने 29 मार्च 23 रोजी प्रशासकिय मान्यता दिली. न.प.ने निविदा प्रक्रिया पूर्ण करून नऊ ऑक्टोबर 23 रोजी  संबंधित एजंसी ला काम करण्याचे आदेश दिले  सर्व कामे सात एप्रिल 25 पर्यंत पूर्ण करण्याचा करारनामा करण्यात आला मात्र कंत्राटदाराने मुदतीत काम न केल्याने त्यास बारा महिन्यांची मुदत वाढ दिली तरीही सात एप्रिल २६ पर्यंत योजनेचे काम पूर्ण झाले नाही व शहरवासी यांना वेळेवर पाणी मिळाले नाही या योजनेतील आठवडी बाजारातील व पिंपळनेर येथील जल कुंभाचे काम पूर्ण झाल्यामुळे त्यांचे लोकार्पण आज ११ एप्रिल 26 रोजी आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले तर शहरातील बारा किलोमीटरची पाईपलाईन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शहरवासीयांना वेळेवर मुबलक पाणी मिळणार नाही एवढे मात्र निश्चित. यावेळी नगराध्यक्ष माधुरी शीपने  उपाध्यक्ष वनिता भुतडा ,गटनेते प्रदीप वाघ , ठाणेदार ब्रम्हा गिरी,   विष्णू झोरे, विकास कासारे शेख अतीक ,संदीप शिंदे, माजी नगर अध्यक्ष गोविंदराव झोरे, संतोष खांडे भराड, धनशीराम शिपणे, तुषार शिपणे, राजेश भुतडा, अफरोज बाबा, निशिकांत भावसार, अलका धन्नावत ,राजेंद्र खांडेभराड, गोविंद तिडके, म.नासेर बागवान, डॉ. गणेश मांटे,डॉ. शंकर तलबे ,प्रा. सदाशिव मुंढे ,सुनील शेजुळकर, लक्ष्मण कव्हळे, मुख्याधिकारी अरुण मोकळ, कंत्राटदार पी.एल.आडके उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top