Robbery Gang Apprehended :एम.आय.डी.सी. व खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्राणघातक हल्ला करून लुटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ४८ तासात जेरबंद केले. ७ एप्रिल रोजी चार अज्ञात दुचाकीस्वारांनी लुटमर केली होती. आरोपींमध्ये तीन विधी संघर्ष ग्रहीत बालकांचाही समावेश आहे.

एम.आय.डी.सी. व खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली होती लुटमार, स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
संजय तायडे
अकोला : एम.आय.डी.सी. व खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्राणघातक हल्ला करून लुटमार करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या ४८ तासात जेरबंद केले. ७ एप्रिल रोजी चार अज्ञात दुचाकीस्वारांनी लुटमर केली होती. आरोपींमध्ये तीन विधी संघर्ष ग्रहीत बालकांचाही समावेश आहे.
७ एप्रिल रोजी चार अज्ञात दुचाकीस्वारांनी एकावर प्राणघातक हल्ला करून लुटले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक, अकोला अचिंत चांडक यांनी स्थानीक गुन्हे शाखा अकोलाचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना सदरील गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सुचना दिल्या. तसेच उपविभागीय पोलीस अधीकारी शहरविभाग यांचे पथक स्था.गु.शा. अकोलाचे २ पथक, पो.स्टे. एम.आय.डी.सी. चे एक पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याबाबत आदेशित केले .त्यावरून पो. नि. शंकर शेळके स्वतः सहकारी अधिकारी व टिमसह पो.स्टे. एम.आय. डी.सी. येथे भेट देवुन फिर्यादी सोबत स्वतः विचारपुस केली. तसेच फिर्यादी सोबत घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. मिळालेल्या सि.सि.टी.व्ही. च्या आधारे स्था.गु.शा. पथकाला सुचना दिल्या. सदर पथकातील ०३ अधिकारी व १० अंमलदार यांनी वेगवेगळ्या भागात जावुन मिळालेल्या फुटेज च्या आधारे गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती संकलीत करून तांत्रीक विश्लेषणाच्या आधारावर दिनांक १० एप्रिलच्या सकाळ दरम्यान एक आरोपी नामे हर्षदीप भाऊराव डोंगरे, वय २० वर्ष रा. कृषीनगर अकोला यास तालुका तेल्हारा येथुन ताब्यात घेतले. त्याने सदर गुन्हयाची कबुली करून सोबत असलेले ३ विधी संघर्ष ग्रहीत बालकांची नावे सांगितली.
सकाळी पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून गुन्हयात सहभागी ३ विधी संघर्ष ग्रहीत बालकांना ताब्यात घेतले, सदर तिघी विधी संघर्ष ग्रहीत बालकांची विचारपुस करीत असतांना त्यांनी दिनांक ०९ एप्रिल रोजीचे रात्री अशीच लुटमार व मारहाण केल्याची घटना केल्याचे कबुली दिली. या घटनेबाबत पो.स्टे. खदान, अकोला येथे तक्रार दाखल करण्याची कारवाई सुरू होती. अशाप्रकारे सतत दोन दिवसात दोन गंभीर गुन्हे करणारी टोळी स्थानीक गुन्हे शाखा अकोला ते ताब्यात घेतुन त्यांना पुढील कारवाई करिता पो.स्टे. एम.आय.डी. सी. अकोला यांचे ताब्यात दिले. विसबा बालकांच्या पालकांना सूचना देऊन चौकशी कामी बोलावण्यात येणार आहे. तसेच जरी अल्पवयीन असले तरी JJ अक्ट नुसार मा. न्यायालयाला तपास अधिकारी कडून त्यांचे विरुद्ध प्रौढ म्हणून खटला दाखल करण्याची विनंती करण्यात येणार आहे.
ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक सा, जि. अकोला, अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी सा, नि अकोला, परि. सहायक पोलीस अधीक्षक ईशानी आंनद ठाणेप्रभारी अधिकारी एम.आय.डी.सी. यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, तसेच स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. विष्णु बोडजे व अंमलदार शेख हसन, रविंद्र खंडारे, अब्दुल माजीद, महेंद्र मलिये, वसिमोद्दीन, किशोर सोनोने, एजाज अहमद, श्रीकांत पातोंड, अशोक सोनवणे, अमोल दिपके, राहुल गायकवाड, चालक मनिष ठाकरे, देवानंद खरात, व सायबर सेलचे स्वप्नील दामोदर यांनी केली.

