Mahabreaking

[breaking_news]

22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू

22-Year-Old Man : शहरातील खोरेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना  9 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.

22-Year-Old Man

देऊळगाव राजा शहरातील घटना ;  जलतरण तलावातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

गजानन तिडके

देऊळगाव राजा : शहरातील खोरेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना  9 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि. जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सद्यस्थितीत उन्हाळा उच्च तापमानामुळे बहुतांश युवा मंडळी जलतरण तलावाकडे आकर्षित होतात परंतु तेथे येणाऱ्या प्रत्येकासाठी काही उपाययोजनांची मान्यता देताना करण्यात आलेली आहे. परंतु त्याचे सर्रास उल्लंघन देऊळगाव राजा  राजा येथेहोत असल्याचे आज गंभीर प्रत्यय आला. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम हा नाशिक येथे कामासाठी राहत होता. तो आपल्या नातेवाईकांकडे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी देऊळगाव राजा येथे आला होता. कार्यक्रमानंतर मित्रांसोबत तो वॉटर पार्कमध्ये गेला. मात्र, मौजमजेच्या क्षणातच काळाने झडप घातली आणि पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे वॉटर पार्कच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. घटनास्थळी योग्य लाइफगार्ड किंवा सुरक्षा व्यवस्था होती का, याबाबत संतप्त नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रशासनाने याची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.  दरम्यान, या घटनेमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.देऊळगाव राजा पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top