Mahabreaking

🔴 BREAKING
mango orchards :आंबा बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार MLA Manoj Kayande :काँग्रेसच्या माघारीत आमदार मनोज कायंदेंनी बजावली निर्णायक भूमिका Unidentified Womans Body Solved :अज्ञात महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले; कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली mango orchards :आंबा बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देणार MLA Manoj Kayande :काँग्रेसच्या माघारीत आमदार मनोज कायंदेंनी बजावली निर्णायक भूमिका Unidentified Womans Body Solved :अज्ञात महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले; कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली

Unidentified Womans Body Solved :अज्ञात महिलेच्या प्रेताचे गुढ उकलले; कौटुंबिक वादातून पतीनेच केली हत्या

Unidentified Womans Body Solved :शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या अन्नपूर्णा माता मंदिराच्या बाजुला असलेल्या लेआऊटमध्ये एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेले प्रेत दिनांक ०६/०४/२०२६ रोजी आढळले होते.  प्रेताचे चेहरा जाळुन प्रेताची ओळख पटणार नाही अशा अवस्थेत प्रेत मिळुन आले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कौटूंबिक वादातून पतीनेच हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. रविना मोहन पवार वय २४ वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच सादीक शहा तसरीफ शहा वय २९ वर्ष रा. नांदखेडा, ता. मंगरूळपीर जि. वाशिम असे आरोपीचे नाव आहे.

Unidentified Womans Body Solved

ओळख पटू नये म्हणून जाळला मृतदेह : आरोपी पतीस केली पोलिसांनी अटक

संजय तायडे

अकोला : शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या अन्नपूर्णा माता मंदिराच्या बाजुला असलेल्या लेआऊटमध्ये एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेले प्रेत दिनांक ०६/०४/२०२६ रोजी आढळले होते.  प्रेताचे चेहरा जाळुन प्रेताची ओळख पटणार नाही अशा अवस्थेत प्रेत मिळुन आले होते. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कौटूंबिक वादातून पतीनेच हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी पतीस अटक केली आहे. रविना मोहन पवार वय २४ वर्ष असे मृतक महिलेचे नाव आहे. तसेच सादीक शहा तसरीफ शहा वय २९ वर्ष रा. नांदखेडा, ता. मंगरूळपीर जि. वाशिम असे आरोपीचे नाव आहे.

डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत अन्नपूर्णा मंदिराच्या बाजुला असलेल्या खुल्या जागेत एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन   पोलीस अधीक्षक   अर्चित चांडक यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शहरविभाग   सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक शंकर शेळके स्थानीक गुन्हे शाखा, अकोला, पोलीस निरीक्षक दिपक कोळी पो.स्टे. डाबकीरोड अकोला यांनी घटनास्थळी भेट दिली होती. तसेच मृतक महिलेची ओळख पटवुन मारेक-यांचा शोध घेण्यासाठी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक, तसेच पोलीस स्टेशन डाबकीरोड येथील पथक नियुक्त करण्यात आले होते.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी परिसरातील सि.सि.टी.व्ही. फुटेज चेक करण्यात आले असता संशयीत फुटेज स्थानीक गुन्हे शाखा, अकोलाच्या पथकाचे ताब्यात आले होते परंतु आरोपीचे ओळख पटली नव्हती.  शहरातील पोलीस स्टेशन मधील मिसींग तपासण्यात आले परंतु मयत स्त्री बाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती. त्यामुळे सदर मयत स्त्रीचा ओळख पटविण्याकरिता शोध पत्रिका शहरातील विविध व्हॅट्स अॅप ग्रुप व ईतर समाज माध्यमावर प्रसारित करण्यात आले. यादरम्यानच दिनांक ०८/०४/२०२६ रोजी संशयीत आरोपी नामे सादीक शहा तसरीफ शहा वय २९ वर्ष रा. नांदखेडा, ता. मंगरूळपीर जि. वाशिम याने पोलीस स्टेशनला हजर येवुन त्याची पत्नी नामे रविना मोहन पवार वय २४ वर्ष हिचा सोबत वाद होवुन तिचा खुन केल्याचे कबुली करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे सांगितले.

आरोपी आणि मयत स्त्री यांची प्रेम विवाह होता, रविना मोहन पवार हिचे हे दुसरे लग्न होते. त्यांच्यात सतत वाद होत होते. घटनेच्या रात्री रागाच्या भरात आरोपी सादीक शहा कडुन पत्नीचा खुन करण्यात आला व पुरावा नाहिसा करण्याचे उद्देशाने प्रेत घटनास्थळावर आणुन जाळल्याची कबुली दिली आहे.या प्रकरणी पि.एम. रिपोर्ट अप्राप्त आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन डाबकीरोड पोलीस करीत आहे.

ही कार्यवाही पोलीस अधिक्षक अर्चित चांडक ,   अपर पोलीस अधिक्षक बी. चंद्रकांत रेड्डी,   उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला   सुदर्शन पाटील, पो.नि. शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपक कोळी पो.स्टे. डाबकीरोड अकोला. स.पो.नि. अभिषेक अंधारे पो.उप.नि. अनिल चव्हाण तसेच स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पथक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक, तसेच पोलीस स्टेशन डाबकीरोड येथील पथक यांनी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top