1 quintal and 12 kg of ganja : बाळापूर शहरातील बेलदारपुरा भागात वाहनांमध्ये साठवून ठेवलेल्या एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजार ०५७ रु किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखा, बाळापूर पोलीसांची ऑपरेशन प्रहार अंतर्गत संयुक्त कारवाई
संजय तायडे
अकोला : बाळापूर शहरातील बेलदारपुरा भागात वाहनांमध्ये साठवून ठेवलेल्या एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजार ०५७ रु किंमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा आणि बाळापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत आज दिनांक ०८/०४/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांचे पथकाला बेलदारपुरा परिसरात काही व्यक्ती त्यांच्या ताब्यातील वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा साठवनुक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून पथकाने वरिष्ठांना माहिती दिली तसेच ठाणेदार प्रकाश झोडगे यांचे सोबत समन्वय साधून संयुक्तरीत्या छापा टाकण्याचे नियोजन करण्यात आले.
पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पोहोचून आरोपींच्या घरासमोर पाहणी केली असता एक ट्रक व एक पांढऱ्या रंगाची फॉर्च्यूनर कार उभी असल्याचे दिसून आले. संबंधित वाहनांबाबत चौकशी केली असता ती वाहने आरोपी वापरत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पंच व राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत दोन्ही वाहनांची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान फॉर्च्यूनर कार क्र. MH-05-BA-1010 मध्ये मागील बाजूस एक पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये ओलसर हिरवट रंगाचा गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला. तसेच ट्रक क्र. MH-30-BD-3130 च्या केबिनमध्ये दोन पांढऱ्या रंगाच्या पोतड्या आढळून आल्या. फॉर्च्यूनर कार व ट्रक अशा दोन्ही वाहना मधून एकूण ११२.०९ कि.ग्रॅ. गांजा जप्त करण्यात आला. सदर गांजाची अंदाजे बाजार किंमत प्रति किलो ₹२३,०००/- प्रमाणे ₹२५,७८,०५७/- इतकी आहे. तसेच गांजा वाहतूक करण्यासाठी वापरलेलीट्रक क्र. MH-30-BD-3130 (किंमत अंदाजे ₹२०,००,०००/-) फॉर्च्यूनर कार क्र. MH-05-BA-1010 (किंमत अंदाजे ₹१०,००,०००/-) अशी एकूण ₹५५,७८,०५७/- किंमतीचा मुद्देमाल पंच व राजपत्रित अधिकारी यांच्या उपस्थितीत जप्त करून सीलबंद करण्यात आला.
या प्रकरणी आरोपी नामे मोहम्मद असलम मो. आजम, वय ४९ वर्षे, रा. बेलदारपुरा, बाळापूर, मोहम्मद अजमल मो. आजम, वय ४२ वर्षे, रा. बेलदारपुरा, बाळापूर यांनी संगनमताने स्वतःचा आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने अवैधरित्या गांजा साठवून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) कलम ८, २० (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, पोलीस निरीक्षक श्री. शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली PI प्रकाश झोडगे ठानेदार बाळापुर, PSI गोपाल जाधव, PSI नयन पाटील, PSIशरद सैदाने, Psi संभाजी हिवाळे. PSIमाधुरी पाटील. HC शेख हसन, रवि खंडारे, महेंद्र मलिये, किशोर सोनोने, मो. एजाज, शेख, वसीमोद्दीन, अ. माजिद, श्रीकांत पातोंड, अशोक सोनोने, व चालक मनिष ठाकरे तसेच अंकुश मोरे, सोहेल खान, शुभम गई, संदीप पेड, सुरेश भारसाकळे, मोहन ढाकरे पोलीस स्टेशन बाळापुर येथील पोलीसांनी केली.

