Mahabreaking

🔴 BREAKING
District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक

Vanchit lights a stove :सिलिंडर टंचाईविरोधात वंचितने तहसील कार्यालयासमोर पेटवली चूल

Vanchit lights a stove : राज्यासह देशभरात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. या गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक आंदोलन करीत तहसील कार्यालयासमोरच चूल पेटवली. एवढेच नव्हे तर ठेचा भाकर तयार करून प्रशासनाचा निषेध केला.  ‘नरेंद्र, कधी मिळणार आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Vanchit lights a stove

बाळापूरात आक्रमक आंदोलन ; ठेचा भाकर तयार करून केला शासनाचा निषेध

 ज़ाकिर अहमद

बाळापूर : राज्यासह देशभरात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. या गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक आंदोलन करीत तहसील कार्यालयासमोरच चूल पेटवली. एवढेच नव्हे तर ठेचा भाकर तयार करून प्रशासनाचा निषेध केला.  ‘नरेंद्र, कधी मिळणार आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.

वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने सध्याच्या गॅस टंचाईचा  विरोध करण्यात आला. बाजारात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर नियंत्रण आणावे, काळाबाजारी बंद करावी, गॅसच्या मर्यादा वाढवाव्या, काळाबाजारी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, सरकारने छात्रावासात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सामुदायिक स्वयंपाकघर सुरू करावे, प्रत्येक २ किलोमीटर अंतरावर भोजन व्यवस्था करून गरजू व्यक्तींना भोजन उपलब्ध करावे, ही परिस्थिती कधी सामान्य होणार याचे उत्तर सरकारने द्यावे, बिना केवायसी तत्काळ गॅस सिलेंडर उपलब्ध करावेत, जिल्हाधिकाऱ्यांनी उज्ज्वला गॅस योजना अंतर्गत जिल्ह्यात किती लोकांना गॅस सिलेंडर दिले याचा ऑडिट करावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

वंचित बहुजन आघाडीचे संजय उमाळे (नगरसेवक) यांनी इतर पदाधिकार्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. या प्रसंगी महिला आघाडी तालुका अध्यक्ष अनुराधाताई डांगे, जाहेदा बी.इंदुबाई वानखडे, अॅड प्रकाश वानखेडे, सागर ऊपरवट, सरपंच (शेळद) सिद्धार्थ वानखडे, अॅड सुबोध डोंगरे, निरजन शिरसाठ,प्रदिप शिरसाठ ठेकेदार, रुपेश जंजाळ,हर्षल लोंखडे लहु सेना जिल्हाध्यक्ष, वाकोडे माजी सभापती, शेषराव वानखडे, यांच्यासह वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते या विरोध प्रदर्शनात सहभागी झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top