Mahabreaking

🔴 BREAKING
District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक District Collector  :जिल्हाधिकारी उद्या बाळापुर दौर्‍यावर; जनसंवाद बैठकीत नागरिकांना समस्या मांडण्याचे आवाहन   Satypal Maharaj :महिलांच्या अंगातून अंधश्रद्धा निर्मुलन होत नाही तोपर्यंत समाज सुधारणा अशक्य : सत्यपाल महाराज Speeding Cargo Vehicle :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव मालवाहु उलटले; सुदैवाने जीवितहानी टळली District-Level Program :दिग्रस येथील जिल्हा परिषद शाळेत उद्या गुढीपाडवा ,पट वाढवा जिल्हास्तरीय कार्यक्रम Prataprao Jadhav :सत्यशोधक चळवळ सुरू करुन सामाजिक क्रांती घडविण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले : प्रतापराव जाधव 1 quintal and 12 kg of ganja :एक क्विंटल १२ किलो गांजासह ५५ लाख ७८ हजारांचा एवज जप्त, दोन आरोपींना अटक

A Helping Hand :शॉक लागून जखमी झालेल्या आदिवासी महिलेला मदतीचा हात!

A Helping Hand : तालुक्यातील जामवसु शिवारातील शेतात भाजीचा फुलोरा तोडण्यासाठी झाडावर चढल्याने शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या आदिवासी महिलेला वीज वितरण केंद्र धाबा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी ६ एप्रिल रोजी भरीव आर्थिक मदतीचा हात दिला.

A Helping Hand

 महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी

बबन इंगळे

बार्शीटाकळी : तालुक्यातील जामवसु शिवारातील शेतात भाजीचा फुलोरा तोडण्यासाठी झाडावर चढल्याने शॉक लागून गंभीर जखमी झालेल्या आदिवासी महिलेला वीज वितरण केंद्र धाबा अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी ६ एप्रिल रोजी भरीव आर्थिक मदतीचा हात दिला.

१४ मार्च रोजी जामवसू येथील शेतकरी वसंत राठोड(नाईक) यांच्या शेतात कांदा कापण्याचे काम आटोपून इतर मजुरांसोबत घरी परतणाऱ्या संगीता किसन तीवाले ही आदिवासी मजूर महिला रोड लगतच असलेल्या दयाळू राठोड(नाईक) यांच्या शेतातील गोंधणीच्या झाडावर भाजीला फुलोरा तोडण्यासाठी चढली. झाडाजवळून गेलेल्या विद्युत तारेला तिचा अनावधानपणे स्पर्श झाल्याने तिला विजेचा जबर धक्का बसला व ती खाली कोसळली. गंभीर जखमी अवस्थेत तिला अकोला येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. जखमी महिलेच्या डोक्याला ,पायाला व कमरेला गंभीर इजा झाल्याने तिला अपंगत्व आले. जखमी महिलेची घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याची दखल घेऊन महावितरण कंपनी बार्शीटाकळीचे उपविभागीय अधिकारी अभियंता उल्हास वाघ यांच्या मार्गदर्शनात विद्युत वितरण केंद्र धाबाचे शाखा अभियंता जी. एस. काळे, प्रधान तंत्रज्ञ एस. बी. डाबेराव, वरिष्ठ तंत्रज्ञ जी. डी. अरखराव, एस. बी. गेडाम, डी. एस. गवई, आर. एम. मांजरे, सी.बी. झिंगरुट,एन. एस. वनवे, एम. आर. कल्याणकर, तंत्रज्ञ आर.पी. आठवले, विद्युत सहाय्यक एस.एन. लोथे,एस. पी. आत्राम,बाहयस्रोत कर्मचारी प्रवीण इंगळे ,ऑपरेटर व्ही.टी. चव्हाण, एन. बी .मानकर, बी.एस.दिवनाले आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिकरित्या भरीव मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top