Annual Prize Distribution :राज़ मायनॉरिटी एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अली पब्लिक स्कूल, बाळापूर येथे चालू शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक व सहशालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

शैक्षणिक व सहशालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार
ज़ाकीर अहमद
बाळापूर :राज़ मायनॉरिटी एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अली पब्लिक स्कूल, बाळापूर येथे चालू शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक व सहशालेय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन स्पर्धा तसेच पवित्र रमजान महिन्यात आयोजित विशेष शैक्षणिक व प्रशिक्षणात्मक कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, पदके आणि उपयुक्त भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जुबेर नदिम यांनी सांगितले की, शाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे. केवळ शैक्षणिक यशच नव्हे तर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास आणि नैतिक शिक्षण हेसुद्धा संस्थेच्या प्राधान्यक्रमात आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊन आपल्या कौशल्यांचा विकास करण्याचे आणि भविष्यात देश व समाजाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास मौलाना रियाजुद्दीन, शुऐबुद्दीन, डॉ. जुबेर नदिम, तौसीफुर्रहमान, अंबर काझीम, मोहम्मद मुज़म्मिल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रिजवाना परवीन यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. संचालन अलमास मुजम्मिल आणि रिजवान अहमद यांनी केले, तर रखशन्दा अंजुम यांनी आभार मानले. या यशस्वी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. डॉ. जुबेर नदिम यांनी विद्यार्थ्यांना मेहनत व प्रगतीचा संदेश दिला.

