Mahabreaking

[breaking_news]

Indisciplined Vehicles :साखरखेर्डा आठवडी बाजारात बेशिस्त वाहनांना लगाम , बाजार हर्रासी आतील ओट्यावर करावी

Indisciplined Vehicles :साखरखेर्डा ही बाजारपेठ मोठी असून दर  शुक्रवारी येथे आठवडी बाजार  भरत असतो . परंतू येथे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. यासाठी शिस्त ही महत्त्वाची बाब ठरली आहे . बसस्थानकावर वाहकांना शिस्त लावण्याचे काम ठाणेदार यांनी केले असले तरी सकाळी होणारी रस्त्यावर हर्रासी ती आतील ओट्यावर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Indisciplined Vehicles

साखरखेर्डा : साखरखेर्डा ही बाजारपेठ मोठी असून दर  शुक्रवारी येथे आठवडी बाजार  भरत असतो . परंतू येथे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. यासाठी शिस्त ही महत्त्वाची बाब ठरली आहे . बसस्थानकावर वाहकांना शिस्त लावण्याचे काम ठाणेदार यांनी केले असले तरी सकाळी होणारी रस्त्यावर हर्रासी ती आतील ओट्यावर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

जवळपास ३५ ते ४०  खेड्याचा संपर्क साखरखेर्डा गावाशी येतो . त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असते ,   शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने वर्दळ ही जास्त असते.  या ठिकाणी भुरटे चोरट्यांचा फार मोठ्या प्रमाणात वावर होत असून कुणाचे मोबाईल तर कोणाची सोन्याची चैन अशा बऱ्याच प्रकारच्या घटना या बाजारात घडत असतात  . याचा महिलांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ३ एप्रिल रोजी स्वतः ठाणेदार गजानन करेवाड यांनी आपल्या कर्मचाऱ्यासह संपूर्ण बाजारात पाहणी केली.  बस स्टॅन्ड परिसरात  येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसला बस स्टैंड वर बस पलटण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही . अनेक नागरिक बाजारात खरेदी  करण्यासाठी आपली मोटरसायकल बसस्थानकावर लावतात . यामुळे फार मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते . याबाबत मेहकर  येथील एसटी बसचे चालक यांनी आगार व्यवस्थापक  यांच्याकडे तक्रार केली होती . त्याअनुषंगाने ठाणेदार गजानन करेवाड यांनी स्वतः लक्ष घालून आठवडी बाजाराच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवली.   बेशिस्त व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात आली .  तसेच बाजारात व परिसरात अनेकदा वाहनांची गर्दी होऊन नागरिकांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो .  याची दखल घेत ठाणेदार यांनी स्वतः उपस्थित राहून वाहतूक सुरळीत ठेवण्याची नियोजन केले .  नो  पार्किंग झोन मध्ये उभे असलेल्या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली . तसेच काही वाहनांच्या चालकांना समज देण्यात आली.  या कारवाईमुळे बाजारात शिस्तबद्ध वातावरण निर्माण झाले होते .  अशा कामास नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले असून विशेषतः महिला जेष्ठ नागरिक व शेतकरी वर्गाला याचा मोठा दिलासा मिळाला आहे . ठाणेदार यांच्या तत्पर आणि प्रभावी कार्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत झाली असून अशा प्रकारच्या विविध  मोहिमा सातत्याने राबवाव्यात अशा अपेक्षा सुज्ञ नागरिकाकडून होत आहे .

साखरखेर्डा येथील आठवडी बाजारात शुक्रवार  , रविवार , मंगळवार , बुधवार या चार दिवशी भाजीपाल्याची आवक होते . व्यापारी त्या मालाची हर्रासी चक्क रोडवर करतात . त्यामुळे सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत वाहने रस्त्यावर उभी असतात . येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रस्ताच राहत नाही . याची दखल घेऊन सकाळी होणारी हर्रासी ही बाजारातील ओट्यावर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

 

 

 

नागरिकांनी शुक्रवार हा बाजाराच्या दिवशी आपली वाहने रोडच्या बाजुला लावावी व महिलांनी बाजारात शक्यतोवर अंगावर दागिने घालून येऊ नये व कुणालाही अशा संशय चोरट्याचा आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा

 

गजानन करेवाड ठाणेदार साखरखेर्डा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top