Mahabreaking

🔴 BREAKING
Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक Villagers aggressive :दुसरबीडमध्ये पाणी, गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक Digambar Lokhande :जिल्हा परिषद शाळेमधूनच अधिकारी तयार होतात:   दिगंबर लोखंडे     22-Year-Old Man :जलतरण तलावामध्ये  22 वर्षीय तरुणाचा बुडाल्याने मृत्यू Maharashtra Provincial Tailik Mahasabha :महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, बुलढाणा जिल्हा कार्यकारिणी जाहीर Two Accused in Robbery Case :जबरी चोरीतील दोन आरोपी गजाआड; रोख रक्कम,दुचाकीसह १.४७ लाखांचा एवज जप्त Wife Murdered :यावलखेडमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने केला खून; आरोपी पतीला अवघ्या तासाभरात अटक

With traditional stoves :चुली पेटल्या , घरगुती सिलिंडर मिळणार कधी ?  हाॅटेल व्यवसायिकांनी शोधला पर्यायी मार्ग

With traditional stoves : साखरखेर्डा येथील ग्रामीण भागातील सिलिंडर गॅस केंद्रांवर दिवसेंदिवस ग्राहकांची गर्दी वाढतच चालली असून आता घरोघरी मातीच्या चुली पेटल्या आहेत . तर हाॅटेल व्यवसायिकांनी पर्यायी व्यवस्था केली आहे .

With traditional stoves

साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील ग्रामीण भागातील सिलिंडर गॅस केंद्रांवर दिवसेंदिवस ग्राहकांची गर्दी वाढतच चालली असून आता घरोघरी मातीच्या चुली पेटल्या आहेत . तर हाॅटेल व्यवसायिकांनी पर्यायी व्यवस्था केली आहे .

साखरखेर्डा येथे मे प्रल्हाद इण्डेन गॅस एजन्सी असून संपूर्ण ग्रामीण भागातील ग्राहकांना सिलिंडर वाटपाचे काम करीत आहे . गेल्या एक महिन्यापासून जगावर युध्दाचे सावट पसरले आहे . याचा फटका ग्रामीण भागातील व्यवसायावर बसला आहे . आज प्रत्येक घरातून चुली हद्दपार झाल्या आहेत . गॅस सिलेंडर नाही तर जेवण नाही , अशी काही भुमिका गृहिणींनी घेतली आहे . घरातील गॅस सिलेंडर संपल्याने ग्राहक गॅस एजन्सी समोर ठाण मांडून बसले आहेत . कोणाची केवायसी नसल्याने ऑनलाईन बँकिंग होत नाही. केवायसी झाली तर बुकिंग होत नाही , बुकिंगसाठी काॅल केला तर चार थांबा , तुम्ही ४५ दिवसांपूर्वी सिलेंडर घेतले असेल तर बुकिंग होते . बुकिंग झाली आता नंबर केव्हा लागेल यासाठी प्रतिक्षा करा . त्यामुळे झटपट सिलेंडर मिळेलच यावर अवलंबून राहू नका . यासाठी पर्यायी व्यवस्था नागरिकांनी करावी, असा अलिखित संदेश मिळत आहे . आज अनेक घरांमध्ये चुली पेटल्या आहेत . परंतू नविन मुलींना चुलीवर स्वयंपाक येत नसल्याने त्यांची तारांबळ उडत आहे . फोन आल्याशिवाय गॅससाठी येऊ नये असे आवाहन करुनही दररोज शेकडो ग्राहक सकाळी सात वाजता सिलेंडर घेऊन हजर होतात . काही रात्री आठ वाजेपर्यंत थांबतात ,  विनवणी करतात . परंतू पर्याय काहीच नसल्याने त्यांना परत जावे लागते . आज प्रत्येक ग्राहकाच्या घरात डबल कनेक्शन आहेत . एक चालू आहे , दुसरा घरात भरलेला आहे , तरीही ऑनलाईन बुकींग करून त्यांनी ठेवली आहे . त्यांचा नंबर आला तर रिकामे सिलेंडर नसल्याने त्यांना गॅस सिलेंडर नेता येत नाही . त्यामुळे एजन्सी संचालकांना त्याही परिस्थितीचा सामना करावा लागत आहे . त्या ग्राहकांनी इतरांना मदत कशी करता येईल यासाठी प्रयत्न करावेतअशी मागणी होत आहे.

हाॅटेल व्यवसायिकांनी शोधला पर्यायी मार्ग

साखरखेर्डा येथील अनेक हाॅटेल व्यवसायिकांना व्यवसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही . शासनाने ते तात्पुरते बंद केले आहेत . व्यवसाय करण्यासाठी त्यांनी लागडी शेगडीचा वापर सुरू केला आहे . परंतू त्यावर माल काढण्यासाठी अधिकाचा वेळ लागत आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top