Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Deulgaon Mahi :देऊळगावमहीत शेतमालासह २.१९ लाखांचा एवज लंपास ;अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Deulgaon Mahi :देऊळगावमही शिवारात शेतातील टिनशेड फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा माल लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

Deulgaon Mahi

गजानन तिडके

देऊळगाव राजा : देऊळगावमही शिवारात शेतातील टिनशेड फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा माल लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय पुरुषोत्तम शिंगणे (वय २८, व्यवसाय शेती, रा. देऊळगावमही, ता. देऊळगाव राजा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा प्रकार समोर आला. दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजतापासून ते ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात आरोपींनी त्यांच्या शेतातील टिनशेडमधून चोरी केली. चोरट्यांनी ३६ पोते म्हणजेच सुमारे २५ क्विंटल तूर (किंमत अंदाजे २ लाख रुपये), गॅस सिलेंडर (३ हजार रुपये), स्वयंपाकाचा भट्टा (४ हजार रुपये), पाण्याचे जार (५०० रुपये), घरगुती भांडी (१० हजार रुपये) तसेच चारपाई (२ हजार रुपये) असा एकूण २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५, ३३४ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याची नोंद ३१ मार्च रोजी सायंकाळी ४.४० वाजता पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतमालाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top