Mahabreaking

[breaking_news]

Mehkar Panchayat Samiti :विविध विषयावर गाजली मेहकर पंचायत समितीची आमसभा

Mehkar Panchayat Samiti : पाणीटंचाईसह विविध विषयावर मेहकर पंचायत समितीची आमसभा गाजली. या आमसभेत वेगवेगळ्या विभागाच्या २६ लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आमसभेचे अध्यक्ष आमदार सिध्दार्थ खरात यांनी दिले. मेहकर येथील कृषी वैभव 31 मार्च रोजी वार्षिक आमसभा व सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.

Mehkar Panchayat Samiti'

 वेगवेगळ्या विभागाच्या २६ लेखी तक्रारी :पाणीटंचाईवर तातडीने उपाय योजना करण्याचे आदेश

मेहकर : पाणीटंचाईसह विविध विषयावर मेहकर पंचायत समितीची आमसभा गाजली. या आमसभेत वेगवेगळ्या विभागाच्या २६ लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश आमसभेचे अध्यक्ष आमदार सिध्दार्थ खरात यांनी दिले. मेहकर येथील कृषी वैभव 31 मार्च रोजी वार्षिक आमसभा व सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मेहकर / लोणार मतदारसंघाचे आमदार  सिद्धार्थ खरात, व्यासपीठावर किशोर गारोळे नगराध्यक्ष नगरपरिषद मेहकर, उपविभागीय अधिकारी महसूल, तहसीलदार विविध पक्षाचे तालुकाध्यक्ष व विविध पदाधिकारी व तालुक्यातील विविध कार्यालयाचे कार्यालयीन प्रमुख उपस्थित होते.

सर्वप्रथम तालुक्यातील संत गाडगेबाबा अभियान, मुख्यमंत्री समृद्ध ग्राम अभियान यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंच/ प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रीय स्तरावर आरोग्य विषयक मानांकनामध्ये तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जानेफळ ची निवड झाल्याबद्दल व प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगावला सुद्धा राज्यस्तरावरील चंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच तालुकास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची सुद्धा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सदर सभेमध्ये एकूण २६ लेखी निवेदन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, सदर तक्रारीचे क्रमवारीप्रमाणे वाचन करून त्यावर मा. अध्यक्ष महोदयांनी अभ्यासपूर्वक निर्णय देऊन तक्रारकर्त्याचे समाधान केले. त्यामधील पाणीटंचाई सारख्या महत्त्वाच्या तक्रारीवर तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी व्यवस्था करून सदर तक्रारी तत्काळ निकाली काढण्याचे संबंधित विभागाला निर्देश दिले. एकंदरीत आमसभेत उपस्थित तक्रारीचे वाचन होऊन त्यावर निर्णायक स्वरूपात अधिकाऱ्यांना आदेशित केल्यामुळे उपस्थित सर्व सरपंच/ प्रशासक व नागरिक यांनी समाधान व्यक्त केले. या  सभेसाठी सरपंच प्रशासक, पत्रकार सर्व विभागाचे अधिकारी/ कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमसभेच्या यशस्वीतेसाठी  गटविकास अधिकारी दिनकर खरात, सहाय्यक गटविकास अधिकारी धीरज जाधव, कृषी अधिकारी संदीप मेटांगळे व सर्व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top