Thieves Strike :डोणगाव परिसरात सध्या शेती चोरटे सक्रिय झाले असून समृद्धी महामार्गाजवळील शेतातून अज्ञात चोरट्यांनी पाईप व केबल चोरी केल्याची घटना दि. २८ मार्च रोजी उघडकीस आली आहे.

समृद्धी महामार्गाजवळील शेतातून साहित्य लंपास; शेतकऱ्याचे नुकसान
डोणगाव : डोणगाव परिसरात सध्या शेती चोरटे सक्रिय झाले असून समृद्धी महामार्गाजवळील शेतातून अज्ञात चोरट्यांनी पाईप व केबल चोरी केल्याची घटना दि. २८ मार्च रोजी उघडकीस आली आहे.
शेलगाव देशमुख रोडवरील समृद्धी महामार्गाजवळ प्रशांत तुकाराम आवटी यांचे शेत आहे. या शेतातील बोअरवेलवरील खांबापासून सुमारे १०० फूट केबल तसेच सहा पाईप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. या घटनेत अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
सध्या उन्हाळा सुरू झाल्याने शेतातील पाणीपुरवठ्याशी संबंधित साहित्य चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरट्यांनी पाईप व केबल चोरीवर सपाटा लावल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने परिसरात गस्त वाढवून चोरट्यांवर आळा घालावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

