Mahabreaking

🔴 BREAKING
Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक   Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Fire broke : विद्युत  तारांच्या घर्षणाने लागली आग, साडे चार एकरातील मका जळून खाक  

Jai Shri Ram :बाळापूर नगरीत ‘जय श्रीराम’चा गजर; रामजन्मोत्सव भक्तिभावात संपन्न!

Jai Shri Ram :शहरातील प्राचीन श्रीराम मंदिर येथे गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम नवमी निमित्त आयोजित करण्यात आलेला श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

Jai Shri Ram

प्राचीन श्रीराम मंदिरात भाविकांची उसळलेली गर्दी; रामनवमी उत्सवात भक्तीचा महापूर

 जाकीर अहमद

बाळापूर : शहरातील प्राचीन श्रीराम मंदिर येथे गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी श्रीराम नवमी निमित्त आयोजित करण्यात आलेला श्रीराम जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

दुपारी बरोबर १२ वाजता भगवान श्रीराम यांच्या जन्माचा पवित्र क्षण साजरा होताच संपूर्ण मंदिर परिसर ‘जय श्रीराम’च्या गजराने दुमदुमून गेला. मंत्रोच्चार, घंटानाद आणि आरतीच्या मंगलमय वातावरणात पार पडलेला हा सोहळा भाविकांसाठी अत्यंत समाधानकारक ठरला. उपस्थितांनी श्रीरामांचे दर्शन घेत आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

यानंतर दुपारी १२.३० ते ३.३० वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता, तर सर्वत्र भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळत होते.

या भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम व मारोती संस्थान ट्रस्ट, बाळापूर यांच्या वतीने करण्यात आले होते. ट्रस्टचे पदाधिकारी व स्वयंसेवकांनी कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

रामनवमीच्या या पावन सोहळ्यामुळे संपूर्ण बाळापूर नगरीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवात सहभागी होत धार्मिक एकात्मतेचा आणि श्रद्धेचा सुंदर संदेश दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top